uldhana Police : नागरिकांचे रक्षक असलेले पोलीसच कसे भक्षक होतात? याचं एक ताजं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. बुलढाण्यातील पोलिसांनी हे लाजीरवा...
uldhana Police : नागरिकांचे रक्षक असलेले पोलीसच कसे भक्षक होतात? याचं एक ताजं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. बुलढाण्यातील पोलिसांनी हे लाजीरवाणं कृत्य केलं असून एका जीवंत महिलेला मृत महिला असल्याचं दाखवून त्यांनी माणुसकीला काळीमा फासणार काम केलं आहे.हे करताना संबंधित महिलेच्या कुटुंबियांना पोलिसांनी धमकावून हा प्रकार केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाची चर्चा आज विधानसभेत झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांचं कृत्य लाजीरवाणं होतंच अशी कबुली दिली तसंच त्यांच्या बडतर्फीच्या सूचनाही दिल्या आहेत.
Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्याप्रकरणाला नवे वळण! होणारी पत्नी सिया-चेतनचे आधीच झाले होते गुप्त लग्न?
विधानसभेत काय झाली चर्चा?
शिवानी कळमेकर यांच्या न झालेल्या हत्येचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. त्यानुसार, जळगाव-जामोदमध्ये एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला, त्याचा पोलिसांना शोध लावता येत नव्हता. त्यामुळं शेजारच्या मध्य प्रदेशातील गरीब आदिवासी पिता-पुत्राला त्यांनी पकडून आणलं आणि त्यांच्यावर जबरदस्ती करुन त्यांची मुलगी जिवंत असताना देखील जो मृतदेह सापडला तो त्यांच्या बहिणीचा नसताना देखील त्यांना कबूल करायला लावलं की, तो त्यांच्या बहिणीचाच मृतदेह आहे. यातून चुकीचा मेसेज समाजात गेला आहे.दरम्यान, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, "पोलिसांचं वागणं हे अत्यंत चुकीचं होतं, त्यामुळं तिथले क्राईमसहित सर्व पीआय, पीएसआय या घटनेशी संबंधित सर्वजण निलंबित करण्यात आले आहेत. फौजदारी कारवाई देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे. आपल्याला माहिती आहे की, पहिलं निलंबन असतं त्यानंतर यात ज्यांचा थेट संबंध असेल अशाचं तर निष्काषणच केलं पाहिजे. त्यामुळं जे निष्काषणाला (बडतर्फीला) पात्र असतील त्यांना सेवेतून बडतर्फ देखील करण्यात येईल"


COMMENTS