पेपर फुटी प्रकरणावरुन देशात गदारोळ माजला आहे. हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभर...
पेपर फुटी प्रकरणावरुन देशात गदारोळ माजला आहे. हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलन सुरु आहे.
देशभरात आंदोलन पेटले असताना सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. धर्मेंद्र प्रधान ना राजीनामा देणार, ना पलायल करणार. धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी भाजपने जबरदस्त प्लान आखल्याची माहिती समोर येत आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षांकडून आंदोलन सुरु आहे. देशभरात आंदोलन सुरु असताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वत: पुढे येऊन आपण कुठेही जाणार नाही, असा स्पष्ट संकेत दिले आहेत. 'कॉकरोच जनता पार्टी'ने (Cockroach Janta Party - CJP) धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनम्याची मागणी करत हे आंदोलन सुरु केले आहे. जंतर मंतरवर आंदोलन करत संसदेवर धडक देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना अडवताना पोलिसांनी तुफान लाठीचार्ज केला. यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने देखील आंदोलन केले.
या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वत: यावर भाष्य केले आहे. आंदोलकांच्या प्रश्नांवर आणि मुद्द्यांवर संसदेत सर्वसमावेशक चर्चा होईल अशी घोषणा प्रधान यांनी केली आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर सरकार किंवा पक्षाकडून कोणताही दबाव नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनावर टीका केली. विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर करत असल्याची टीका धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधींवर केला. 'राहुल गांधींच्या आंदोलनामुळे जनतेची गैरसोय होत आहे. 'विद्यार्थ्यांसाठी उपाय शोधणं हा त्यांचा उद्देश नव्हता असा आरोप त्यांनी केला.
देशभरात आंदोलन सुरु असताना धर्मेंद्र प्रधान स्व:त पुढे येऊन बाजू मांडली आहे. भाजपकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. यावरुनच भाजप धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या तयारीत नसल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारने विरोधी पक्ष तसेच जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात एक नवीन रणनीती आखल्याचे दिसत आहे. 21 जुलै रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत जाहीरपणे स्वत:ची बाजू मांडली.
सरकारच्या वतीने संसदेत धर्मेंद्र प्रधान या मुद्द्यावर विरोधी पक्षांना सामोरे जाणार असल्याची भाजपची रणनीती दिसत आहे. सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी तसेच ज्या समस्या आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी तयार आहे. लोकशाही मार्गेना सभागृहात चर्चेत सहभागी होण्याऐवजी राजकीय तमाशा केल्याचा आरोप त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर केला आहे.
सरकार याप्रकरणी चर्चेला तयार आहे त्यामुळे गोंधळ कशाला असं आवाहन यावेळी किरेन रिजिजूंनी केलं.. तर मोदींच्या नेतृत्त्वाली सरकार हे पारदर्शी सरकार आहे. दोषींवर सरकार कठोर कारवाई करणार मात्र विरोधकांनाच कामकाज होऊ द्यायचं नाही असा आरोप जे.पी. नड्डा यांनी केला. दरम्यान जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही अशी मागणी मल्लिकार्जून खरगेंनी केली.


COMMENTS