मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आणि लाडकी सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीने नुकतीच तिच्या कर्जतमधील आलिशान फार्महाऊसची झलक चाहत्य...
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आणि लाडकी सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीने नुकतीच तिच्या कर्जतमधील आलिशान फार्महाऊसची झलक चाहत्यांना दाखवली आहे.म्हाला शहराच्या धावपळीपासून दूर एखाद्या शांत, निसर्गरम्य ठिकाणी सुट्ट्या घालवायला आवडेल का? त्यातही जर ते ठिकाण तुमच्या लाडक्या अभिनेत्रीचं असेल तर?
पावसाळ्याची चाहूल लागताच हिरवाईने नटलेल्या या फार्महाऊसचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून, सध्या तो चांगलाच व्हायरल होत आहे.
प्राजक्ताच्या या फार्महाऊसभोवतीचे सौंदर्य पावसाळ्यात आणखीच खुलून दिसतंय. हिरव्यागार डोंगररांगा आणि पावसाच्या रिमझिम सरींमुळे हा परिसर अतिशय विलोभनीय वाटतो.
शहराच्या गजबजाटापासून दूर असलेल्या या आलिशान फार्महाऊसमध्ये एकाच वेळी तब्बल १५ ते २० जण आरामात राहू शकतात. मोठा प्रशस्त हॉल, आकर्षक इंटिरिअर आणि अत्याधुनिक सुविधा इथे उपलब्ध आहेत.सध्या सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती या जागेच्या भाड्याची! एका अंदाजानुसार, शनिवार आणि रविवारी या फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं जवळपास ३० हजार रुपये आहे. तर दुसरीकडे, सोमवार ते शुक्रवार या वीक डेजमध्ये हेच भाडं १७ ते २० हजार रुपयांच्या घरात असतं.


COMMENTS