औद्योगिक परिसरात धक्कादायक प्रकारात एका कामगाराचा मृत्यू झाला या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे औद्यो...
औद्योगिक परिसरात धक्कादायक प्रकारात एका कामगाराचा मृत्यू झाला
या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
पुणे जिल्ह्यातील सणसवाडीमध्ये एका धक्कादायक घटना घडली आहे. एका सहकाऱ्याने आपल्या एका सहकाऱ्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला आणि हवा भरली. कॉम्प्रेसरची हवा पोटात गेल्यानं कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील औद्योगिक परिसरातील एका कंपनीत घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बिकीकुमार भाईलाल सरोज असं संतापजनक कृत्य करणाऱ्या आरोपी कामगाराचे नाव आहे. तर या प्रकरणात संतोषकुमार किशोर यादव (वय ३२) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार ३० जून २०२६ रोजी पहाटे पाचच्या सुमारास सणसवाडी येथील वेस्टर्न इंडिया फोर्ज प्रा. लि. कंपनीमध्ये ही घटना घडली.अमावस्येला पूजा करून महिलेसोबत अश्लील कृत्य, भोंदू भोसलेचं भयंकर कृत्य, सोलापूर हादरले
आरोपी बिकीकुमार भाईलाल सरोज याने फिर्यादीचा मेहुणा नरेश सुलेंद्र यादव (वय ४२, मूळ जि. गया, बिहार) यांच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला आणि शरीरात हवा सोडली. पोटात मोठ्या प्रमाणात हवा गेल्यानं नरेश यादव प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कामाच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षा, कामगारांवरील देखरेख, सुरक्षा नियमांची अंमलबजावणी आणि पर्यवेक्षण यावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या विचित्र घटनेमागील नेमके कारण, हेतू आणि इतर सर्व बाबींचा तपास सुरू आहे.


COMMENTS