प्रतिनिधी - प्रा. निलेश आमले सर जुन्नर : कर्मयोगिनी संस्था पुणे यांच्या तर्फे आयोजित लेक लाडकी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर...
प्रतिनिधी - प्रा. निलेश आमले सर
जुन्नर : कर्मयोगिनी संस्था पुणे यांच्या तर्फे आयोजित लेक लाडकी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत १०८ कवींनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर येथील शिक्षिका आणि कवयित्री सरिता म्हेत्रे कलढोणे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
समूहाच्या संस्थापिका सीमाताई गांधी यांनी लेक लाडकी काव्य संमेलन आयोजित केले होते.या संमेलनात विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. १००० रु रोख आणि सन्मानचिन्ह देऊन सरिता म्हेत्रे कलढोणे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम पाटील उद्घाटक चंद्रकांत दादा वानखेडे,प्रमुख अतिथी राजेंद्र घावटे, सुरेश कंक ,सविता इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल सरिता म्हेत्रे कलढोणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



COMMENTS