प्रतिनिधी : देविदास झुरुंगे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2026 चा निकाल नुकताच ज...
प्रतिनिधी : देविदास झुरुंगे
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला, यामध्ये महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल 100 टक्के लागला, तर द्वितीय वर्षाचा निकाल 97.7% लागला.
द्वितीय वर्षामध्ये कुणाल गोपीचंद जाधव 79.09% माधुरी अमित दरेकर 75.91% व ऋतुजा भानुदास नरके, जानवी दत्तात्रय शिंदे 75.64% गुण मिळवून अनुक्रमे पहिला,दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. तर प्रथम वर्षामध्ये कुसुम सुजाराम चौधरी 78.10% श्रावणी मंगेश नळकांडे 77.40% व श्रुती राजाराम गोडसे 76.70% गुण मिळवून अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री.नासीर शेख, सहसचिव अँड. जाहीर शेख, संस्थेचे सीईओ श्री.अमीर इनामदार, प्राचार्य डॉ. संपत नवले व विभाग प्रमुख सौ. सोनल सातव यांनी अभिनंदन केले.


COMMENTS