सैराटमधील सल्या ढसाढसा रडला, तुकाराम मुंढेंचा सोलापुरातील रुग्णालयाला दणका; ५ तासांत मोठी कारवाई! | CrimeNama
Loading ...

सैराटमधील सल्या ढसाढसा रडला, तुकाराम मुंढेंचा सोलापुरातील रुग्णालयाला दणका; ५ तासांत मोठी कारवाई!

  सोलापूर: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १२ जून रोजी काढलेल्या आदेशात, 'रुग्णांना रुग्णालयातील औषध विक्री दुकानातून औषध ...

 


सोलापूर: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १२ जून रोजी काढलेल्या आदेशात, 'रुग्णांना रुग्णालयातील औषध विक्री दुकानातून औषध खरेदी करण्याची सक्ती नाही', असे स्पष्ट नमूद केलेलं असतानाही राज्यात असे प्रकार अजूनही सुरू असल्याचं समोर आलं आहे.नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमात 'सल्या'ची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख याला सोलापुरातील एका रुग्णालयात याबाबतचा भयंकर अनुभव आला. "माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने सोलापुरातील नोबल रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी गोळ्यांसाठी प्रिस्क्रिप्शन दिले. या गोळ्या मी बाहेरच्या मेडिकलमधून आणतो, असं सांगितल्यानंतरही त्यांनी मला रुग्णालयातीलच मेडिकलमधून गोळ्या घेण्यास भाग पाडलं. ज्या गोळ्या मी बाहेरच्या मेडिकलमधून २० हजारांमध्ये आणू शकत होतो, तिथे त्यांनी माझ्याकडून ४० हजार रुपये घेतले," असा आरोप अरबाज शेख याने सकाळी केला होता. अरबाजच्या या व्हिडिओची सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाने तत्परता दाखवत नोबल रुग्णालयाशी संलग्न असलेल्या फातिमा मेडिकलची तपासणी करत औषध विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


अभिनेता अरबाज शेख याच्या आरोपानंतर नोबेल रुग्णालयातील फातिमा मेडिकल सील करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी मेडिकलची तपासणी केली. तपासणीनंतर अरुण गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर ओपीडी आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टरां दिलेली औषधांची चिठ्ठी फातिमा मेडिकलमधील संगणकावर प्रसिद्ध होते. त्यामुळे प्राथमिक माहितीनुसार रुग्णांना याच मेडिकलमधून औषध घेण्यास सांगितले जात असल्याचे पुरावे आढळले आहेत," असं गोडसे यांनी स्पष्ट केलं आहे.


मेडिकलमध्ये अनेक त्रुटी


अन्न व औषध अधिकारी अरुण गोडसे यांना मेडिकलची तपासणी करताना अनेक त्रुटी आढळल्या आहेत. सदर मेडिकलमध्ये मुदत संपलेली म्हणजेच एक्सपायर झालेली औषधे आढळून आली आहेत.


अरबाज शेखचे आरोप


अभिनेता अरबाज शेख यांच्या वडिलांवर सोलापुरातील नोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रुग्णालयाकडून लूट सुरू असल्याचा आरोप करत त्याच रुग्णालयातून औषधे खरेदी करणे बंधनकारक असल्याचा दावा व्हिडिओमध्ये अरबाज शेख याने केला होता. "आम्ही वडिलांनी इथे दाखल केल्यानंतर त्यांनी १० हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितले. हे डिपॉझिट भरल्यानंतर त्यांनी आम्हाला काही गोळ्यांसाठी प्रिस्क्रिप्शन दिले. आम्ही या गोळ्या बाहेरून आणून देतो असं सांगितल्यानंतर त्यांनी त्याला नकार दिला आणि रुग्णालयाच्याच मेडिकलमधून औषधे आणून देण्यास सांगितलं. काही इंजेक्शन असतील ते सुद्धा इथूनच घ्यावे लागतील असं सांगितलं," असा आरोप अरबाज शेखने केला होता.


काय आहे एफडीएचा आदेश?


"अनेकदा डॉक्टर अमुक एका मेडिकलमधूनच औषधे घ्या, असा आग्रह करतात. पण, रुग्णांना कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे विकत घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधून औषधे घेण्यास भाग पाडू नये," असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले होते. या निर्देशांचे उल्लंघन करणारी रुग्णालये, डॉक्टर व औषध विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता.

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4831,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1769,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,961,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,379,Maharashtra,2140,Mumbai,539,Nagpur,77,Nashik,85,Politics,752,Politics.,7,Pune,2068,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: सैराटमधील सल्या ढसाढसा रडला, तुकाराम मुंढेंचा सोलापुरातील रुग्णालयाला दणका; ५ तासांत मोठी कारवाई!
सैराटमधील सल्या ढसाढसा रडला, तुकाराम मुंढेंचा सोलापुरातील रुग्णालयाला दणका; ५ तासांत मोठी कारवाई!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi6NFq5ZoISowR3p6Rghi2j2Y0464Kyax5vriMU8T7rAPjxfJWO5EKBs1eP58t6acywa8R_4Kbkd0jmqeUafvVuiDIEzcCijtQykZM-4phCAd1BhPflbN5pPfcVpntfkHBB9drokl2ZvOY2ICcUhLV5CR8hqtY5m5PCXMAEMdbJOSrXpkJe_w5_eKdCux8/s320/IMG_20260709_140526.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi6NFq5ZoISowR3p6Rghi2j2Y0464Kyax5vriMU8T7rAPjxfJWO5EKBs1eP58t6acywa8R_4Kbkd0jmqeUafvVuiDIEzcCijtQykZM-4phCAd1BhPflbN5pPfcVpntfkHBB9drokl2ZvOY2ICcUhLV5CR8hqtY5m5PCXMAEMdbJOSrXpkJe_w5_eKdCux8/s72-c/IMG_20260709_140526.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_830.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_830.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content