काही दिवसांपूर्वी शुभांगी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना वेग आला हो...
काही दिवसांपूर्वी शुभांगी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना वेग आला होता. अखेर आज त्या शिंदे गटात प्रवेश करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना शुभांगी पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली होती. “अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. निर्णय झाल्यानंतर मी स्वतः सर्वांना माहिती देईन,” असे त्यांनी म्हटले होते. त्याचवेळी त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीबाबत आणि पक्षांतर्गत घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती.
या नाराजीनंतरच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसणार आहे. पक्षाच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपनेत्या शुभांगी पाटील आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोण आहेत शुभांगी पाटील?
शुभांगी पाटील या ठाकरे गटाच्या उपनेत्या असून, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. राजकारणाबरोबरच त्या शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय असून, राज्य शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या गाजलेल्या निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या चुरशीच्या लढतीत त्यांनी सुमारे ४० हजार मते मिळवत राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
आता शुभांगी पाटील शिंदे गटात प्रवेश करत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी हा उत्तर महाराष्ट्रातील मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत ठाकरे एक मोठी घोषणा करणार असून, राम मंदिरातील कथित दान घोटाळ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे.
या आंदोलनाचा भाग म्हणून ठाकरे गटाकडून राज्यभरातील प्रमुख राम मंदिरे आणि हनुमान मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. आंदोलनाची सुरुवात दादर पश्चिम येथील हनुमान मंदिरातील 'रामरक्षा महाआरती'ने होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आगामी काळात सरकारला कोंडीत पकडण्याचा ठाकरे गटाचा मानस आहे. याबाबतची अधिकृत माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत दिली आहे.


COMMENTS