'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं? | CrimeNama
Loading ...

'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?

  सैराट'फेम अभिनेता अरबाज शेख (Arbaaz Sheikh) याने काही दिवसांपूर्वी वडिलांच्या उपचारासंदर्भात रडत रडत व्हिडिओ केलेला. सोलापूरमधील नोबेल...

 


सैराट'फेम अभिनेता अरबाज शेख (Arbaaz Sheikh) याने काही दिवसांपूर्वी वडिलांच्या उपचारासंदर्भात रडत रडत व्हिडिओ केलेला. सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटलच्या (Nobel Hospital) मनमानी कारभारावर आरोप केले होते.

या हॉस्पिटलच्या मेडिकलमधून औषध खरेदीसाठी सक्ती करण्यात येत असल्याचं अरबाजने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्यानंतर एफडीएने कारवाई करत नोबेल हॉस्पिटलमधील संबंधित मेडिकल दुकानांची तपासणी करून या दुकानांवर कारवाई केली होती. अरबाजच्या वडिलांच्या उपचार संदर्भात 'एबीपी माझा'ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे. आता 'सैराट' फेम अभिनेता अरबाज शेख (Arbaaj Sheikh) याच्या वडिलांवर उपचारासाठी सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने पुढाकार घेतला असून डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पूर्ण मदत करण्याचे मान्य केलं आहे.


अरबाजच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल


मराठी अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांना मेंदूचा आजार झाल्याने त्यांना सोलापूरचा नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, या रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषध खरेदी करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप केला होता.या व्हिडिओची दखल घेत सोलापूरच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी नोबल हॉस्पिटलचे पाहणी केली.या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्यानंतर तातडीने औषध विक्री बंद करण्याच्या आदेश दिल्याची माहितीही अन्न आणि औषध प्रशासनाने दिली. दरम्यान, या संदर्भातील एबीपी माझा ने दिलेल्या बातमीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांनी या विडिओची दखल घेत शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना सोलापुरात जाऊन भेट घेण्याचे सूचना दिल्या होत्या.त्यानुसार चिवटे यांनी अरबाज शेख यांची भेट घेत त्यांच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनंतर सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचे उपचार करण्यासाठी पुढाकार घेतलाय.

शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर वळसंगकर हॉस्पिटलने उपचारासाठी पूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तसेच एस पी न्युरोसायन्सच्या डॉ. वळसंगकर यांना वैद्यकीय मदत करण्याचे विनंती केली, त्यानुसार डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पूर्ण मदत करण्याचे मान्य केलं आहे. अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान मोठा खर्च झाल्याने आर्थिक मदत आणि हॉस्पिटलकढून होणारी लूट याविषयी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर केला होता.


शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अरबाज शेख काय म्हणालेला?


अरबाज शेख व्हिडीओमध्ये म्हणालेला की, "नमस्कार मी अरबाज शेख, मी आता सोलापुरातील नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. आठ दिवस झाले, पप्पांना ब्रेन हॅमरेज झालंय म्हणून सोलापूरला अॅडमिट केलंय. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला नोबल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं. नोबल हॉस्पिटलचा अनुभव मला इतका घाण आला की, जेव्हा आम्ही पेशंटला तिथे अॅडमिट केलं, तेव्हा सर्वात 10 हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले... त्यानंतर त्यांनी मला गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की, या गोळ्या आपल्याला लागतील. मग मी त्यांना विचारलं की, मी हे बाहेरुन आणू शकतो? तर त्यांनी सांगितलं की, नाही तुम्हाला आमच्या मेडिकलमधूनच त्या गोळ्या, इंजेक्शन्स घ्यावा लागतील. मी त्यांच्या मेडिकलमधून औषधं घेतली, तर ती सर्व औषधं 40 हजारांहून जास्त किमतीची होती. त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घ्यावीत, हा फोर्स होता. यापूर्वी जेव्हा पप्पांना अॅडमिट केलं, तेव्हा तिथे मला असा काहीच अनुभव आला नाही. त्या गोळ्या मी बाहेरुन आणल्या की, जवळपास अर्ध्या किमतीत मला त्या पडत होत्या. पण इथे एवढी लूट होतीय, माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचं, म्हणून मला त्यांना नोबलमधून शिफ्ट करावं लागलं. मला खूपच इथे वाईट अनुभव आलाय, त्यामुळे ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावं की, मी कुठे ट्रिटमेंट केली पाहिजे? कशी ट्रिटमेंट केली पाहिजे मला आता काहीच कळत नाहीये, माझ्या वडिलांना मला वाचवायचंय काही करुन, मला मदत करा प्लीज..."

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4879,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1791,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,101,Gadchiroli,6,Health,500,India,985,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,36,Lifestyle,384,Maharashtra,2161,Mumbai,542,Nagpur,77,Nashik,85,Politics,762,Politics.,8,Pune,2077,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: 'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZVQr1jZIfqX29a0Xa0xIr4O_xrIpUCM9Dya03Vy2l19CNxvcein9-HSCImKS02X1l17JUbyBidsjulnsPLn3DdByZMqhEL4kDe-WeqhH65WH9M4nAFpDj9qiqO_CvYJ-UG5X_3zyK5rP2nkuezyh5a0_aFZZ8IsOhbiJi4WyXh27u7pzxyylp59J7S6k/s320/n7192307431783765263914f5e4918877b46e29c14fcc0affa43b52975cd1ff1e6a6e2c4dca4592c2caabb9.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZVQr1jZIfqX29a0Xa0xIr4O_xrIpUCM9Dya03Vy2l19CNxvcein9-HSCImKS02X1l17JUbyBidsjulnsPLn3DdByZMqhEL4kDe-WeqhH65WH9M4nAFpDj9qiqO_CvYJ-UG5X_3zyK5rP2nkuezyh5a0_aFZZ8IsOhbiJi4WyXh27u7pzxyylp59J7S6k/s72-c/n7192307431783765263914f5e4918877b46e29c14fcc0affa43b52975cd1ff1e6a6e2c4dca4592c2caabb9.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_799.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_799.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content