जालना जिल्ह्यात एका खाजगी बस चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका तरुणाने बस थांबवून त्यामधील एका ओळखीच्या यु...
जालना जिल्ह्यात एका खाजगी बस चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका तरुणाने बस थांबवून त्यामधील एका ओळखीच्या युवतीला खाली उतरवले. हा प्रकार पाहून बस चालकाने त्या तरुणाला याबाबत कारण विचारला.
मात्र, जाब विचारल्याचा राग मनात धरून संबंधित तरुणाने चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने चालकाला बुक्यांनी बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार बसमध्ये बसलेल्या प्रवाशांसमोर घडला. विशेष म्हणजे ही घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच चालकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बसमध्ये चढला अन् ओळखीच्या एका युवतीला खाली उतरवले...
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस जालनाहून शेंद्रा एमआयडीसी येथील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. बस बदनापूर येथील एका पेट्रोल पंपाजवळ पोहोचली असताना एका तरुणाने हात दाखवून बस थांबवली. बस थांबताच तो थेट बसमध्ये चढला आणि त्याच्या ओळखीच्या एका युवतीला खाली उतरवले. हा प्रकार पाहून चालकाने त्या तरुणाला याबाबत विचारणा केली. मात्र, साधा प्रश्न विचारल्याने तो संतापला आणि त्याने चालकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच बसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तरुणावर अदखलपात्र गुन्हा दाखल
या घटनेमुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चालकाला मारहाण होत असल्याचे पाहून काही प्रवाशांनी मध्ये पडून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित तरुणाने त्यांच्याशीही उर्मटपणे वर्तन केले. त्यामुळे काही काळ बसमधील वातावरण तणावपूर्ण झाले. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच चालकाने मोबाईलवर केलेल्या व्हिडिओमध्ये झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMENTS