समाज बदलणारे खरे शिल्पकार समाजकार्यकर्ते होय समाज हा कार्यकर्त्याचा दुवा आहे कोणताही समाज हा फक्त इमारती, रस्ते आणि कायद्यासमवेत विधायकतेने ...
समाज बदलणारे खरे शिल्पकार समाजकार्यकर्ते होय
समाज हा कार्यकर्त्याचा दुवा आहे
कोणताही समाज हा फक्त इमारती, रस्ते आणि कायद्यासमवेत विधायकतेने बनत नाही,तो बनतो तिथल्या लोकांच्या विचारांनी, मूल्यांनी आणि कृतींनी. आणि या कृतींना दिशा देण्याचे काम करतात ते "कार्यकर्ते" कार्यकर्ते म्हणजे जे लोक स्वतःच्या फायद्यापेक्षा समाजाच्या भल्याचा विचार आधी करतात.
एकमेकांशी जोडलेल्या लोकांचा समूह ते आपल्या गरजा समस्या, सोडविण्यात कारणीभूत आहेत आनंद आणि जबाबदाऱ्या आपण एकत्र वाटून घेतो,पण कोणताही समाज परिपूर्ण नसतो.त्यात असमानता, अन्याय, अंधश्रद्धा, प्रदूषण अशा अनेक समस्या असतात. याच समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज लागते.
कार्यकर्ता म्हणजे फक्त आंदोलन करणारा माणूस नाही तर सामाजिक कार्यकर्ता गरीब मुलांना शिक्षण देणारा, वृद्धांसाठी काम करणारा देशास अबादित ठेवणारा असतो हा पर्यावरणात कार्यकर्ता झाडे लावणारा, नदी वाचवणारा,अधिक या हक्कांसाठी लढणारा असावा महिला, शेतकरी, कामगार यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारा असावा,जागरूकता निर्माण करणारा, आरोग्य, स्वच्छता, मतदान याबद्दल लोकांना माहिती देणारा
असावा.थोडक्यात जिथे समस्या दिसते तिथे हात पुढे करणारा हाडामासाचा कार्यकर्ताक्ष असावा.
समाज आणि कार्यकर्ते या नाण्याच्या दोन बाजू आहेत.
कार्यकर्त्याला
समर्थन देणारा समाज घडविणे अधिक अनुभव आणि समस्या समस्यांशिवाय कार्यकर्त्याला कामच करता येणार नाही
कार्यकर्ते समाजाला
दिशा, प्रेरणा आणि बदल. घडवून आनल्याने एखादा कार्यकर्ता एका गावात पाण्याचा प्रश्न सोडवतो, दुसरा मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उघडतो. अशा छोट्या-छोट्या कृतींमधूनच मोठा बदल घडतो.
शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले शाहू महाराज, संत गाडगेबाबा उदापूरचे संत हरिबाबा अण्णा हजारे इ.असे अनेक हे कार्यकर्तेच होते त्यानी समाजाला नवी दिशा दिली. आजच्या काळातील आव्हाने
आज सोशल मीडिया मुळे माहिती पटकन पसरते, पण त्याचबरोबर खोटी माहितीही पसरते. तरुण कार्यकर्त्यांसमोर नवी आव्हाने आहेत:
निधीची कमतरता भासत असल्याने कामे अपुर्ण राहिल्याने समाजभान हरपून जाते चांगले काम करायला पैसे लागतात
लोकांचा उदासीनपणा जानवते आपल्याला काय करायचे आहे ही वृत्ती राजकारण आणि दबावयंत्र बोलणाऱ्यांना अनेकदा विरोध होतो
पण तरीही लोकांच्या सहभागातून खाजगी कामातून म्हणा या सरकारी योजनातून शालेय शिबिर, संमेलने,उस्तव,जयंती आयोजित करणारे हात पुढे येतात.हजारो तरुण कार्यकर्ते आज काम करत आहेत.
यातून निष्कर्ष निघतोकी
समाज हा समायोजित, महत्वपुर्ण कामासाठी योगदान देतात. तर कार्यकर्ते हा त्याचा समाजाभिमुख होऊन कामे करतो.त्याचप्रमाणे समाजात जर कार्यकर्ते नसतील तर तो समाज फक्त जगतो पण प्रगती करत नाही.
बदल हा वरून दिसून येते अधिक प्रकर्शाने जानवते
kharama60@gmail.com


COMMENTS