जुन्नर, दि. 8 : अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील घरांचे, घरातील संसारोपयोगी साहित्याचे, जनावरांच्या गोठ्यांचे तसेच भात पिकांचे झालेल्या मोठ्या ...
जुन्नर, दि. 8 : अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील घरांचे, घरातील संसारोपयोगी साहित्याचे, जनावरांच्या गोठ्यांचे तसेच भात पिकांचे झालेल्या मोठ्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासन नियमानुसार त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा, जुन्नर तालुका समितीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.
किसान सभेने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये कच्ची व पक्की घरे बाधित झाली असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत व आवश्यक जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी किसान सभेचे तालुका अध्यक्ष कोडिभाऊ बांबळे, सचिव मुकुंद घोडे, सहसचिव नारायण वायळ, उपाध्यक्ष संजय साबळे, लक्ष्मण जोशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव गणपत घोडे, डीवायएफआय चे राजू शेळके, एसएफआय चे अक्षय घोडे, सूरज बांबळे, स्वामी गवारी, संदीप शेळकंदे, किसन घोडे, अक्षय साबळे आदींसह उपस्थित होते.



COMMENTS