सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एसी कोचमधील एक केबिन लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी सजवलेली दिसत आहे. रेल्वेने कठोर ...
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एसी कोचमधील एक केबिन लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी सजवलेली दिसत आहे. रेल्वेने कठोर कारवाई करत टीसीला निलंबित केले आहे.
ट्रेनच्या फर्स्ट एसी कोचमधील एक केबिन सजवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने कारवाई करत संबंधित टीसीला निलंबित केले आहेरेल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, "६/७/२६ रोजी, ट्रेन क्रमांक ११०२ नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने आपला फर्स्ट एसी डबा सजवण्यासाठी ऑनलाइन एका डेकोरेटरला खासगीरित्या नियुक्त केले होते. डेकोरेटरचा डब्यात प्रवेश अनधिकृत होता आणि ही एक गंभीर चूक मानली जात आहे. संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे आणि सविस्तर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे." तपासाच्या निष्कर्षांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल..रेल्वेने संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून ही एक गंभीर सुरक्षा त्रुटी असल्याचे म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्याला निष्काळजीपणाबद्दल तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. सविस्तर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.


COMMENTS