प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर: श्री शिव छत्रपती महाविद्यालय,जुन्नर येथील कनिष्ठ महाविद्यालयातील मोफत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राती...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर: श्री शिव छत्रपती महाविद्यालय,जुन्नर येथील कनिष्ठ महाविद्यालयातील मोफत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील कु.दिपक मारुती बगाड व कु.संस्कृत गणेश रसाळ या दोन विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात अग्नीवीर म्हणून निवड झाली आहे.त्यांनी नुकतेच आपले ट्रेनिंग पूर्ण केले आहे. दिपक बगाड या विद्यार्थ्याची नियुक्ती उत्तर प्रदेश येथे व संस्कृत रसाळ या विद्यार्थ्याची नियुक्ती पंजाब येथे झाली आहे. लवकरच हे विद्यार्थी देश सेवेच्या कार्यासाठी रुजू होणार आहेत.
संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.त्यावेळी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील मोफत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचा खूप फायदा झाला,आम्हांला त्यामुळेच हे यश मिळवता आले असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष अ़ॅड.संजय शिवाजीराव काळे यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे,उपप्राचार्य डाॅ.आर.डी.चौधरी,उपप्राचार्या व समन्वयक प्रा पी.एस. लोढा,पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते,एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा.के.जी.नेटके, कला विभाग प्रमुख प्रा आर.एस.कांबळे, सायन्स जेईई व नीट परीक्षा विभाग प्रमुख प्रा.सी.बी.कांबळे, मोफत पोलीस भरती प्रशिक्षण विभागाच्या चेअरमन प्रा.एम.डी.हाडवळे व इतर सर्व प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील देश सेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




COMMENTS