मुंबई : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरश: पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, ...
मुंबई : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरश: पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रकोप बघायला मिळाला. हवामान विभागाकडून नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार, नाशिकमध्ये पाऊस पडत आहे. पण वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे नाशिकवरचं ढगफुटीचं संकट हे अकोले आणि पुढे सुरतच्या दिशेला ढकललं गेलं आहे. पुण्यात घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आता हळूहळू राज्यातील पाऊस ओसरणार आहे. केवळ विदर्भात पाऊस सक्रीय राहण्याची शक्यता आहे.
पालघरला आज रेड तर उद्या यलो अलर्ट
हवामान विभागाकडून आज पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळाली. यानंतर आता पालघरला पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याला उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पुढचे काही दिवस पावसाचा ग्रीन अलर्ट असणार आहे. त्यामुळे पालघरमध्ये पाऊस ओसरणार असल्याचं चित्र आहे.
ठाण्यात पाऊस ओसरणार
ठाणे जिल्ह्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातलेला बघायला मिळाला. सलग पाच दिवस पडलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. पण आता उद्यापासून ठाणे जिल्ह्यात पाऊस ओसरण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज तर उद्यापासून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.मुंबईतही पाऊस ओसरणार
मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. पण आता पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत ठराविक ठिकाणी वाऱ्याचा वेग हा 60 ते 70 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे आणि पावसाची शक्यता आहे. पण उद्यापासून मुंबईत पाऊस ओसरणार आहे.
रायगडला उद्या यलो अलर्ट
रायगड जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. रायगडला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजदेखील रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रायगडमधील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती आहे. दरम्यान, उद्यापासून पाऊस कमी होणार आहे. रायगडला उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरीत काय स्थिती?
रत्नागिरी जिल्ह्याला पुढच्या तीन दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ आजच्या दिवसासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती?
धुळे जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण उद्या पावसाची शक्यता कमी आहे. जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण तितका पाऊस नसेल.
नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण उद्या पावसाची शक्यता कमी आहे. पुण्याच्या घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापूरला यलो अलर्ट
कोल्हापूरच्या घाट परिसरात आज आणि उद्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर साताऱ्यात घाट परिसरात पुढच्या दोन दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 9 जुलैला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांना आजसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्याला 9 जुलैलादेखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्याला 9 आणि जुलैला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


COMMENTS