नगदवाडी ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती केंद्र...
नगदवाडी ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोऱ्हाडे यांनी दिली.
यावेळी इ.५ वी तील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी शरण्या कांबळे,शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थी आरोही शिंदे,सर्वेश बढे,अंजली बढे,कृष्णाली शिंदे,रुद्र कुतळ,सादिया अन्सारी,दयानंद भोर तसेच नासा-इसरो प्रवेश परीक्षेतील पात्र विद्यार्थी मुस्कान शेख,रुद्र कुतळ,दयानंद भोर,आकाश राठोड तसेच शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका आशा आरेकर यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी कांदळी गावचे शिक्षणप्रेमी माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे,ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे,उपाध्यक्ष भावना बढे,अशोक बढे,रघुनाथ बढे,संगिता बढे,महेश बढे,संतोष बढे,दयानंद बढे,दिपाली जाधव,अक्षदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार, विद्या वाघ,उज्वला कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले तर आभार निलेश शेलार यांनी मानले.


COMMENTS