धुळे : धुळे शहरातील नगाव बारी परिसरात धावत्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बसमध्ये एकूण 49 प्रवासी प्रवास करत होते...
धुळे : धुळे शहरातील नगाव बारी परिसरात धावत्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बसमध्ये एकूण 49 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखत बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
नंदुरबार डेपोची नंदुरबार धुळे शिवशाही ही बस धुळे शहरात दाखल झाल्यानंतर नगाव बारी परिसरात धावत्या बस मधून अचानक धूर निघू लागला. यावेळी लागलीच चालकाने वाहकाच्या मदतीने सर्व प्रवासांना गाडीखाली उतरवले.
लागलीच बसला आग लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. यादीच्या दुर्घटनेतयादीच्या दुर्घटनेत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच धुळे महापालिकेचे अग्निशमन दल व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून एसटी प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.


COMMENTS