तू सिनेमात बाकी कोणतीही भूमिका कोणालाही दे, माझं काही म्हणणं नाही; पण... ती भूमिका करू देणार नाही,... स्नेहल तरडे काय म्हणाल्या.. | CrimeNama
Loading ...

तू सिनेमात बाकी कोणतीही भूमिका कोणालाही दे, माझं काही म्हणणं नाही; पण... ती भूमिका करू देणार नाही,... स्नेहल तरडे काय म्हणाल्या..

  दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद २' सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार केला. या चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर कृतज्ञता सोहळ...

 


दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद २' सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार केला. या चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सिनेमाच्या संपूर्ण टीमसह मराठी सिनेविश्वातील कलाकारांनी हा आनंद साजरा केला आहे. 'देऊळ बंद २'च्या यामध्ये कलाकारांनी उत्साहाने चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा केला. यावेळी प्रवीण तरडे यांनी पत्नी व अभिनेत्री स्नेहल तरडे यांना गुडघ्यावर बसून गुलाबाचे फूल दिले. त्यानंतर मजेशीररीत्या भावना व्यक्त केल्या.


'देऊळ बंद २'च्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये प्रवीण तरडे व स्नेहल तरडे या जोडप्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघांनीही काळ्या रंगामध्ये कपडे परिधान करीत ट्विनिंग केले होते. स्नेहल यांनी काळ्या रंगाची साडी, झुमके आणि बांगड्यांसह आकर्षक लूक केला होता; तर प्रवीण यांनी काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला. यावेळी या जोडप्याने संपूर्ण टीमसह मेहनतीने बनवलेल्या कलाकृतीचे यश साजरे केले. या सोहळ्याला तेजस्विनी पंडित, विजू माने, जान्हवी किल्लेकर, अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी यांच्यासह मराठी सिनेविश्वातील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


प्रवीण तरडेंनी बायकोला दिले गुलाब


कार्यक्रमादरम्यान प्रवीण तरडे यांनी स्नेहल यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करीत खास सरप्राईज दिले. त्यांनी गुडघ्यावर बसून स्नेहल यांना गुलाबाचे फूल दिले. प्रवीण म्हणाले, "आयुष्य हे सेटवर तिच्यावर ओरडण्यातच गेलं. त्यामुळे आज निदान गुलाब तरी देतो." प्रवीण यांच्या या प्रेमळ कृतीनंतर स्नेहल लाजल्या आणि त्यांनी नवऱ्याला मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. या दोघांचा हा रोमँटिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी प्रेम व्यक्त केले.



स्नेहल व प्रवीण तरडे यांचा व्हिडीओ व्हायरल


त्यानंतर प्रवीण यांनी स्नेहल यांचे कौतुक करीत म्हणाले, "या हिरोईनने मला १०० कोटी मिळवून दिले आहेत. त्यासाठी मी तिचा कायम ऋणी राहीन." मात्र, त्यानंतर ते आपल्या खास विनोदी शैलीत म्हणाले, "ती आता माझ्या पुढच्या सिनेमात नसेल. कारण- १०० कोटींची हिरोईन मला परवडणार नाही," अशी मिश्कील टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर स्नेहल तरडे यांनीही तितक्याच दिलखुलासपणे प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "तू सिनेमात बाकी कोणतीही भूमिका कोणालाही दे, माझं काही म्हणणं नाही; पण तुझ्या बायकोची भूमिका मीच करेन. ती भूमिका दुसऱ्या कोणाला करू देईन, असं तुला खरंच वाटतं का? मी दुसऱ्या कोणालाही ती भूमिका करू देणार नाही," या दोघांमधील प्रेमळ आणि विनोदी व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


'देऊळ बंद २' चा १०० कोटींचा टप्पा पार


'देऊळ बंद २' सिनेमा २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असून, १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या सिनेमात स्नेहल तरडे, मोहन जोशी, अतुल कुडळे, प्रसाद ओक, ओम भूतकर, मंगेश देसाई, संस्कृती बालगुडे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. या सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटामध्ये स्वामी समर्थ यांची भक्ती आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती ही सांगड घालण्यात आली आहे.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,90,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4921,Buldhana,20,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1814,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,101,Gadchiroli,6,Health,501,India,1004,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,37,Lifestyle,394,Maharashtra,2181,Mumbai,542,Nagpur,78,Nashik,85,Politics,764,Politics.,8,Pune,2093,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,55,Sindhudurg,7,Solapur,54,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: तू सिनेमात बाकी कोणतीही भूमिका कोणालाही दे, माझं काही म्हणणं नाही; पण... ती भूमिका करू देणार नाही,... स्नेहल तरडे काय म्हणाल्या..
तू सिनेमात बाकी कोणतीही भूमिका कोणालाही दे, माझं काही म्हणणं नाही; पण... ती भूमिका करू देणार नाही,... स्नेहल तरडे काय म्हणाल्या..
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWvUmbRjRkMU0TnFIhHFAJys_lTWAX-DUvX1Lk8yYc8Hl9hfH2c2NHYOoF3NPs8hH9jUQbLv47I3E_lNC-AKxknDu26TTGiw37lpR4qTXGvrkdoWcglMcu_0HgzcYikYi7f9JSwMkQhyphenhyphenyGoPCf6U1gVE3J4BFaYd7FqixfMkCwTibCsCuhJLbANQJxpoc/s320/n7193396971783853844444ae6237b84df970ed6375a65e55ddec550d00e29788daae3c405a2f5fe78e8a1b.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWvUmbRjRkMU0TnFIhHFAJys_lTWAX-DUvX1Lk8yYc8Hl9hfH2c2NHYOoF3NPs8hH9jUQbLv47I3E_lNC-AKxknDu26TTGiw37lpR4qTXGvrkdoWcglMcu_0HgzcYikYi7f9JSwMkQhyphenhyphenyGoPCf6U1gVE3J4BFaYd7FqixfMkCwTibCsCuhJLbANQJxpoc/s72-c/n7193396971783853844444ae6237b84df970ed6375a65e55ddec550d00e29788daae3c405a2f5fe78e8a1b.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_379.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_379.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content