"तो ज्या पद्धतीने मला.", हृतिक रोशनबाबत सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य; म्हणाली, "आम्हाला एकत्र एक सीन." | CrimeNama
Loading ...

"तो ज्या पद्धतीने मला.", हृतिक रोशनबाबत सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य; म्हणाली, "आम्हाला एकत्र एक सीन."

  हृतिक  रोशनने वडील राकेश रोशन यांच्या ‘कहो ना… प्यार है’ (२०००) या रोमँटिक चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पण त्यापूर्वीच त्याने काही चित्र...

 


हृतिक  रोशनने वडील राकेश रोशन यांच्या ‘कहो ना… प्यार है’ (२०००) या रोमँटिक चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पण त्यापूर्वीच त्याने काही चित्रपट साइन केले होते. त्याच वर्षी तो विधू विनोद चोप्रा यांच्या ‘मिशन काश्मीर’ आणि खालीद मोहम्मद यांच्या ‘फिजा’ या चित्रपटांमध्ये झळकला होता.फिजामध्ये त्याने दहशतवाद्याची भूमिका साकारली होती. हृतिकबरोबर ‘मिशन काश्मीर’मधून मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने या चित्रपटात हृतिकच्या आईची भूमिका साकारली होती. आता सोनाली कुलकर्णीने हृतिकच्या सुरुवातीच्या काळातील काही आठवणी सांगितल्या आहेत.


‘स्क्रीन स्पॉटलाइट’मध्ये बोलताना सोनाली म्हणाली, “तो ज्या पद्धतीने मला भेटला, ते मला खूप आवडलं होतं. तो प्रचंड शांत, नम्र होता. तो चांगलं काम करण्यासाठी उत्सुक होता. माझ्या ऑडिशनच्या वेळी तो तिथे उपस्थित होता. आम्हाला एकत्र एक सीन करायचा होता. आम्ही एकमेकांना ‘अच्छा करना’ असं म्हटलं होतं. मी जेव्हा त्याला भेटले, तेव्हा मीसुद्धा स्ट्रगलर होते.”


मला जाणवलं नव्हतं की हृतिक इतका देखणा आहे – सोनाली कुलकर्णी


सोनालीने श्रीनगरमध्ये हृतिकबरोबर ‘मिशन काश्मीर’चे शूटिंग केलं, तेव्हा तिला त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज नव्हता. मात्र, ‘कहो ना… प्यार है’च्या अफाट यशानंतरच तिला हृतिकच्या स्टारडमची जाणीव झाली. हसत-हसत ती म्हणाली, “मला अजूनही स्पष्ट आठवतंय, मी एका कार्यक्रमावरून परतत होते, तेव्हा मला मरीन ड्राईव्हवर हृतिकचे एक खूप मोठे पोस्टर दिसले. त्याच्याबरोबर काम करताना मला कधीच जाणवलं नव्हते की तो इतका देखणा आहे.”


 मिशन काश्मीरमधील हृतिक रोशन व सोनाली कुलकर्णी यांचा फोटो 




मुंबईत हृतिकची झलक पाहण्यासाठी झालेली गर्दी – सोनाली कुलकर्णी


सोनाली पुढे म्हणाली, “मुंबईतील एका शूटिंगच्या वेळी हृतिक रोशनची एक झलक पाहण्यासाठी एवढी अफाट गर्दी जमली होती की, मी ते शब्दांत सागू शकत नाही. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाऊन्सर्स आणि सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आलं होतं. ती गर्दी आमच्या कल्पनेच्या आणि अंदाजाच्या पलीकडची होती.” हृतिकच्या लोकप्रियतेची आणखी एक आठवण तिने सांगितली. ती आठवण दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी इथे झालेल्या २००१ च्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यातील होती.


“सन सिटीमधील आयफा पुरस्कारांमध्ये ‘मिशन काश्मीर’साठी मला नामांकन मिळालं होतं. तिथे ज्या रेस्टॉरंटमध्ये रोशन कुटुंब जेवत होते, तिथे हृतिकला पाहण्यासाठी अक्षरशः लोकांची झुंबड उडाली होती. पण अभिनय करताना हृतिक एका अभिनेत्यासारखा वागायचा. त्याला दिग्दर्शक जे करायला सांगायचे तेच तो करायचा,” असं सोनाली कुलकर्णीने सांगितलं. चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण करण्यापूर्वी हृतिकने ‘करण अर्जुन’ (१९९५) पासून ते ‘कोयला’ (१९९७) अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या वडिलांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,90,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4921,Buldhana,20,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1814,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,101,Gadchiroli,6,Health,501,India,1004,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,37,Lifestyle,394,Maharashtra,2181,Mumbai,542,Nagpur,78,Nashik,85,Politics,764,Politics.,8,Pune,2093,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,55,Sindhudurg,7,Solapur,54,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: "तो ज्या पद्धतीने मला.", हृतिक रोशनबाबत सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य; म्हणाली, "आम्हाला एकत्र एक सीन."
"तो ज्या पद्धतीने मला.", हृतिक रोशनबाबत सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य; म्हणाली, "आम्हाला एकत्र एक सीन."
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjgT8Neq8FqASJ4m7LufPkW5WcsnoZAQ8SZUZ-KlHEpN_iD8hEOh5e-5TUSlC_pGP4HPS9wFTE4oqpbVPSzl0iqavlRnX6B3HTPV_9mjO8wOd10ATBbarwTYOovLvkWClrUdom2SMChCcorsi8C8d4DzYbpcuRPs1Ze7qFUifuckI8IatUMe0_Q9_003KM/s320/n71907139417836630237383a7e9c2ca0df5c0de3fcfd8e308637813e25995d661d28ba601956e946bc02ae.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjgT8Neq8FqASJ4m7LufPkW5WcsnoZAQ8SZUZ-KlHEpN_iD8hEOh5e-5TUSlC_pGP4HPS9wFTE4oqpbVPSzl0iqavlRnX6B3HTPV_9mjO8wOd10ATBbarwTYOovLvkWClrUdom2SMChCcorsi8C8d4DzYbpcuRPs1Ze7qFUifuckI8IatUMe0_Q9_003KM/s72-c/n71907139417836630237383a7e9c2ca0df5c0de3fcfd8e308637813e25995d661d28ba601956e946bc02ae.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_348.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_348.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content