रत्नागिरी हादरलं! धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी; महिलेचा मृत्यू | CrimeNama
Loading ...

रत्नागिरी हादरलं! धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी; महिलेचा मृत्यू

  रत्नागिरी: कोकण रेल्वेवरील मांडवी एक्सप्रेस वेगाने मुंबईच्या दिशेने धावत होती. प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू असतानाच काही क्षणांत अस...

 


रत्नागिरी: कोकण रेल्वेवरील मांडवी एक्सप्रेस वेगाने मुंबईच्या दिशेने धावत होती. प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू असतानाच काही क्षणांत असा थरार घडला, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडलं. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि अवघ्या दीड वर्षांच्या मुलासह चालत्या ट्रेनमधून उडी घेतल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून वडील आणि चिमुकला मुलगा गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत. या टोकाच्या निर्णयामागील नेमकं कारण काय, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. घडलेली घटना खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही भयानक दुर्घटना घडली.

काय घडलं नेमकं?मेटे गावाच्या परिसरात काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानंतर आणि रेल्वे प्रशासनाला संशय आल्यानंतर तातडीने खेड पोलीस आणि रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांनाही तातडीने खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शुभ्रा दिवेकर यांचा मृत्यू झाला होता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सध्या शुभ्रा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर गंभीर जखमी झालेल्या सचिन जुवळे आणि त्यांच्या दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलावर उपचार सुरू आहेत.


चालत्या ट्रेनमधून, त्यातही दीड वर्षाच्या पोटच्या गोळ्याला सोबत घेऊन असा टोकाचा निर्णय या जोडप्याने का घेतला? याचे उत्तर अध्यापत स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. धावत्या एक्सप्रेसमधून उडी मारण्यापूर्वी ट्रेनमध्ये त्यांचे काही भांडण झाले होते का, यादृष्टीने सहप्रवाशांचेही जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे.तपास सुरु


शुभ्रा अतिश दिवेकर या महिलेचा रेल्वे ट्रॅकवर कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा लहान मुलगा हे दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. मुसळधार पाऊस आणि वेगाने धावणारी रेल्वे असल्याने उडी मारल्यानंतर तिघेही लोहमार्गाच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. प्राथमिक माहिती आणि उपलब्ध परिस्थितीवरून हा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेमुळे कोकण रेल्वे प्रवाशांसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4841,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1773,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,967,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2144,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,753,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: रत्नागिरी हादरलं! धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी; महिलेचा मृत्यू
रत्नागिरी हादरलं! धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी; महिलेचा मृत्यू
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiy-vITbYWDy-dF26rG4Grz0TmKhTiCmZ8WhaMAz6BtWqVz2HUdoPjYmb-QZS4fIeHN7CXNzZDzvkH0pkUZdrCb6nTMD3AeYD9m-W2g37AJQr6Pzot4w5cm9SK3_x8R9qEHJEZZsA7kXGcKzleSclLcUg_mOULr3UzbOR6_PypzXQKaQxudESrsn6XP_l4/s320/n718426261178317184935376312e2c1c2d0fdce7cd9fcc97490c80df0606cca64754f4335c5fe3c92322d1.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiy-vITbYWDy-dF26rG4Grz0TmKhTiCmZ8WhaMAz6BtWqVz2HUdoPjYmb-QZS4fIeHN7CXNzZDzvkH0pkUZdrCb6nTMD3AeYD9m-W2g37AJQr6Pzot4w5cm9SK3_x8R9qEHJEZZsA7kXGcKzleSclLcUg_mOULr3UzbOR6_PypzXQKaQxudESrsn6XP_l4/s72-c/n718426261178317184935376312e2c1c2d0fdce7cd9fcc97490c80df0606cca64754f4335c5fe3c92322d1.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_321.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_321.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content