एकीकडे सिया गोयल केसने संपूर्ण भारतात पुरूष समाजात भीतीचं वातावरण पसरलेलं असताना आता अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येत आहेत. अशातच आता एका ...
एकीकडे सिया गोयल केसने संपूर्ण भारतात पुरूष समाजात भीतीचं वातावरण पसरलेलं असताना आता अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येत आहेत. अशातच आता एका नर्सने आपल्या पतीला प्रियकरासाठी संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.प्रियकराच्या सांगण्यावरून नर्स म्हणून काम करणाऱ्या संध्याने आपल्याच नवऱ्याला संपवल्याची घटना समोर आलीये. पहिल्या प्रयत्नात नवरा गेला नाही मग आरोपींनी दुसरा सर्वांना चक्रावणारा क्रुर मर्डर केला.
छतावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न
झालं असं की, तेलंगणामध्ये एका नर्सचे गेल्या काही वर्षांपासून एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. तिने विवाहबाह्य संबंधातून प्रियकरासोबत मिळून आपल्या 35 वर्षीय पतीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने 30 जून रोजी नर्सने पतीला छतावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला होता. पण या घटनेत तो वाचला. त्यानंतर त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना त्याच्या सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर इंजेक्ट टाकलं अन् नवऱ्याचा द एन्ड केला. पण पोलिसांच्या नजरेतून ही गोष्ट लपून राहिली नाही.प्रशांतला दारू पाजली अन् गच्चीवर नेलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रशांत हा आखाती देशातून परत भारतात आला होता. तिथं तो कामाच्या निमित्ताने गेला होता. आखाती देशातून परत आल्यानंतर त्याला संध्याच्या अफेअरबद्दल कळले आणि त्यांच्यात भांडणे सुरू झाली. त्यावेळी संध्या तिचा बॉयफ्रेंड अनिल यांनी कट रचला. यामध्ये अनिलचा मित्र देखील सामील होता. योजनेनुसार साईने 29 जून रोजी प्रशांतला दारू पाजली आणि त्यानंतर त्याला एका इमारतीच्या गच्चीवर नेलं, जिथं संध्याच्या फोनवरील सूचनेनुसार त्याला खाली फेकलं. तिथं त्याचा जीव गेला नाही.
सलाईनमधून टॉयलेट क्लिनर दिलं
प्रशांत खाली पडूनही बचावला होता, त्यामुळे त्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आलं. संध्या आणि साई यांनी त्याला घरी आणण्यापूर्वी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये फिरवलं. प्रशांतला कसं संपवायचं? याचा विचार सुरू असताना त्याचा रुग्णालयातच खल्लास करायचा प्लॅन तयार अनिलने केला. संध्या नर्स असल्याने तिला बऱ्याच गोष्टी माहित होत्या. प्रशांतला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना संध्याने कथितरित्या कॅन्युलाद्वारे टॉयलेट क्लिनर आणि भूल देणारे औषध सलाईनच्या माध्यमातून दिलं अन् त्याच प्रशांतचा मृत्यू झाला.आरोपींनी गुन्हा कबूल केला
दरम्यान, पोलिसांनी पत्नी संध्या आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. पोलिसांनुसार, चौकशीत व्यंकट साईनेही पहिल्या खुनाच्या प्रयत्नात आपली भूमिका स्वीकारली आहे. पोलिसांनी पुढे सांगितलं की, चौकशीदरम्यान आरोपींनी नंतर गुन्हा कबूल केला. तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, जिथं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या पोलीस संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.


COMMENTS