Pune Rain News: मुंबई पुण्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्ते, महामार्ग बंद करण्यात आले आहेत. ...
Pune Rain News: मुंबई पुण्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्ते, महामार्ग बंद करण्यात आले आहेत.
पुण्यात कालपासून धो धो पाऊस पडत आहे. याचाच परिणाम आळंदीत झाला आहे. पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे.
आळंदीत वाहनांना प्रवेश करण्यासाठी असलेले चारही पुल इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे बंद करण्यात आलेत.
उद्या आषाढी वारीला सुरुवात होत असून देहुहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 7 जुलैला प्रस्थान होणार आहे. तर 8 जुलै रोजी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यामुळे लाखों वारकरी आणि त्यांची वाहने आळंदीत दाखल होण्याच्या तयारीत आहेत.
पुरामुळे इंद्रायणीत प्रवेश करणारे चारही पुल पाण्याखाली गेल्याने वारकऱ्यांची अडचण होणार आहे.
आळंदीत प्रवेश करण्यासाठी फक्त चाकणच्या बाजूने येणारा रस्ता सध्या उपलब्ध आहे.


COMMENTS