जंगलातील सर्वात बलाढ्य शिकाऱ्यांपैकी एक म्हणजे सिंह. त्याच्या तावडीत एखादा प्राणी सापडला, तर सुटका अशक्यच मानली जाते. पण, एका व्यक्तीसोबत ...
जंगलातील सर्वात बलाढ्य शिकाऱ्यांपैकी एक म्हणजे सिंह. त्याच्या तावडीत एखादा प्राणी सापडला, तर सुटका अशक्यच मानली जाते. पण, एका व्यक्तीसोबत अशी घटना घडली, ज्याचा शेवट पाहून लाखो लोक अवाक् झाले आहेत.या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जंगलात हिंस्र प्राण्यांचा सामना होणे म्हणजे मृत्यू समोर उभा ठाकल्यासारखे असते. विशेषतः सिंहासारखा शक्तिशाली शिकारी समोर आला तर काही क्षणांत सर्व काही संपुष्टात येऊ शकते. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये अगदी वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीला सिंहाने आपल्या पंजात पकडून तब्बल अर्धा तास जमिनीवर दाबून ठेवले, पण त्यानंतर जे घडले ते पाहून अनेकांचा विश्वास बसलेला नाही.
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जमिनीवर निपचित पडलेली दिसते. त्याच्यावर सिंहाने पंजा ठेवलेला असून तो पूर्णपणे त्याच्या ताब्यात आहे. त्या व्यक्तीला हलताही येत नाही आणि मदतीसाठी ओरडण्याचीही हिंमत होत नाही. कारण एक चुकीची हालचालही जीवावर बेतू शकते, याची त्याला पूर्ण जाणीव असते.
सिंहाच्या पंजाखाली अडकलेला हा व्यक्ती मृत्यू अगदी जवळून पाहत होता, तरीही त्याने घाबरून कोणतीही धावपळ केली नाही. शांत राहण्याचा निर्णय त्याने घेतला. हीच त्याची सर्वात मोठी शहाणपणाची चाल ठरली. जर त्याने झटापट केली असती तर सिंह अधिक आक्रमक झाला असता, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.जवळपास तीस मिनिटे ही जीवघेणी परिस्थिती कायम राहिली. प्रत्येक क्षण हा मृत्यू आणि जीवन यांच्यातील संघर्षासारखा होता. अखेर सिंहाने त्या व्यक्तीला सोडून दिले. या हल्ल्यात तो जखमी झाला असला, तरी त्याचा जीव वाचला, त्यामुळे हा व्हिडीओ पाहणारे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
रस्ता नव्हता, वाहन नव्हतं… तरीही ती थांबली नाही; आदिवासी आश्रमशाळेतील आजारी विद्यार्थिनीला पाठीवर घेऊन ६ किमी चालली वॉर्डन, VIDEO व्हायरल
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात सिंहांचा वावर सातत्याने वाढत असल्याची माहिती त्यांनी यापूर्वीही संबंधित विभागाला दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, सिंह किंवा सिंहीण प्रत्येक वेळी शिकार करण्याच्या उद्देशानेच हल्ला करतात असे नाही. काही वेळा ते स्वतःला धोका वाटल्यामुळे किंवा आपल्या परिसराचे संरक्षण करण्यासाठीही आक्रमक होतात. तसेच त्यांचे पोट भरलेले असल्यास ते हल्ला करूनही शिकार पूर्ण करत नाहीत, अशी उदाहरणेही काही वेळा पाहायला मिळतात.हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. अनेकांनी त्या व्यक्तीच्या धैर्याचे कौतुक केले आहे. काहींनी 'अशी वेळ आली असती तर घाबरूनच जीव गेला असता' अशी प्रतिक्रिया दिली, तर काहींनी 'याचे नशीब खूपच बलवत्तर होते' असे म्हटले आहे.
दरम्यान, ही घटना गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील पालीताना तालुक्यातील गरजिया गावात घडल्याचे सांगितले जात आहे. तेथे एका पशुपालकावर सिंहाने हल्ला करून त्याला जवळपास अर्धा तास आपल्या पंजाखाली दाबून ठेवल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्या व्यक्तीने शांतता आणि संयम राखल्यामुळेच त्याचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे.


COMMENTS