राज्यातील ज्वारी बाजारात आज आवक आणि दरात बदल दिसून आले. आज पुणे बाजारात मालदांडी ज्वारीची आवक कालच्या तुलनेत ७४३ क्विंटलवरून आज ७५० क्विंटल...
राज्यातील ज्वारी बाजारात आज आवक आणि दरात बदल दिसून आले. आज पुणे बाजारात मालदांडी ज्वारीची आवक कालच्या तुलनेत ७४३ क्विंटलवरून आज ७५० क्विंटल झाली होती.आज बाजारात कमीत कमी दर ६ हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होता. तर, जास्तीत जास्त दर ६ हजार ५०० रुपयांवरून ६ हजार ३०० रुपये झाला होता. तसेच, सरासरी दर ६ हजार २५० रुपयांवरून ६ हजार १५० रुपये प्रति क्विंटल, म्हणजे १०० रुपयांनी घसरला होता.
तर, बीड बाजारात मालदांडी ज्वारीची आवक काल २५ क्विंटल होती, ती आज ५२ क्विंटल झाली होती. बाजारातील कमीत कमी दर आज १ हजार ८२१ रुपये झाला होता. मात्र, जास्तीत जास्त दर ३ हजार ६९१ रुपये झाला होता. तसेच, सरासरी दर २ हजार ५२१ रुपयांवरून २ हजार ७०३ रुपये प्रति क्विंटल, म्हणजे १८२ रुपयांनी वाढला होता. एकूणच, प्रमुख बाजार समित्यांमध्ये ज्वारीच्या आवकेत वाढ झाली. मात्र, पुणे बाजारात सरासरी दरात घसरण झाली, तर बीड बाजारात सरासरी आणि कमाल दरात वाढ नोंदविण्यात आली.
मका दरात स्थिरता
राज्यातील प्रमुख बाजार समित्यांतील मका बाजारात आजच्या आवकेत चढ-उतार दिसून आले. आज मुंबई बाजारात स्थानिक मक्याची आवक कालच्या तुलनेत १४९ क्विंटलवरून आज १९३ क्विंटल झाली होती. मात्र, कमीत कमी दर २ हजार ४०० रुपये, जास्तीत जास्त दर ३ हजार रुपये आणि सरासरी दर २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होते.
तर, सांगली-मिरज बाजारात लाल मक्याची आवक कालच्या २२० क्विंटलवरून आज ११० क्विंटल झाली होती. मात्र, कमीत कमी दर २ हजार ४५० रुपये, जास्तीत जास्त दर २ हजार ६५० रुपये आणि सरासरी दर २ हजार ५५० रुपये प्रति क्विंटलवर कोणताही बदल झाला नव्हता.तसेच, नागपूर बाजारात मक्याची आवक कालच्या २४ क्विंटलवरून आज २८ क्विंटल झाली होती. येथेही कमीत कमी दर १ हजार ८०० रुपये, जास्तीत जास्त दर २ हजार रुपये आणि सरासरी दर १ हजार ९५० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले होते. एकूण मक्याच्या आवकेत वाढ-घट झाली असली, तरी बाजारभावात कोणताही बदल न होता दर स्थिर राहिले होते.
कापूस दर स्थिर
राज्यातील कापूस बाजारातील आवकेत आज वाढ पाहायला मिळाली, मात्र बाजारभाव हे स्थिरच राहिले होते. आज अमरावती बाजारात कापसाची आवक कालच्या तुलनेत ३५ क्विंटलवरून ५० क्विंटल झाली होती. तर, कमीत कमी दर ८ हजार ८०० रुपये, जास्तीत जास्त दर ९ हजार ५० रुपये आणि सरासरी दर ८ हजार ९२५ रुपये प्रति क्विंटल होता. त्यामुळे बाजारात कालच्या तुलनेत आज कोणताही बदल झाला नव्हता. एकूणच, अमरावती बाजारात कापसाच्या आवकेत वाढ झाली असली, तरी बाजारभावात कोणताही बदल झाला नव्हता.
बटाटा आवकेत चढ-उतार
आज राज्यातील बटाटा बाजारात आज आवक आणि दर दोन्हीतही चढ-उतार दिसून आले. अकोला बाजारात बटाट्याची आवक कालच्या तुलनेत १ हजार ४० क्विंटलवरून आज १ हजार ६२० क्विंटल झाली होती. मात्र, कमीत कमी दर ७०० रुपये, जास्तीत जास्त दर १ हजार २०० रुपये आणि सरासरी दर १ हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले होते.तर, खेड-चाकण बाजारात बटाट्याची आवक कालच्या १ हजार क्विंटलवरून आज ९०० क्विंटल झाली होती. कमीत कमी दर ९०० रुपयांवरून १ हजार रुपये प्रति क्विंटल झाला होता. जास्तीत जास्त दर १ हजार ५०० रुपये आणि सरासरी दर १ हजार २०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले होते.
तसेच, चंद्रपूर-गंजवड बाजारात बटाट्याची आवक आज ३८० क्विंटलवर स्थिर होती. कमीत कमी दर १ हजार २०० रुपये प्रति क्विंटलवर कायम होता. तर, जास्तीत जास्त दर १ हजार ३०० रुपयांवरून १ हजार ३५० रुपये झाला होता. त्याचबरोबर, सरासरी दर १ हजार २५० रुपयांवरून १ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल झाला होता. एकूणच, बटाट्याच्या आवकेत चढ-उतार दिसून आले, तसेच काही बाजारांत दर स्थिर होते.
आंबा दर टिकून
राज्यातील प्रमुख बाजार समित्यांतील आंबा बाजारातील आवकेत आज वाढ दिसून आली, तर बाजारभाव स्थिर राहिल्याचे पाहायला मिळाले. नागपूर बाजारात लोकल आंब्याची आवक काल ८६ क्विंटल होती, तीच आवक आज १ हजार ५०० क्विंटल झाली होती. मात्र, कमीत कमी दर ३ हजार रुपये, जास्तीत जास्त दर ४ हजार रुपये आणि सरासरी दर ३ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होते.
तर, नाशिक बाजारात हायब्रीड आंब्याची आवक कालच्या ४४० क्विंटलवरून आज ४९६ क्विंटल झाली होती. कमीत कमी दर ३ हजार रुपये, जास्तीत जास्त दर ५ हजार रुपये आणि सरासरी दर ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलवर कोणताही बदल झाला नव्हता. एकूणच, बाजारभावात कोणताही बदल न होता दर स्थिरच होते.


COMMENTS