जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलशेठ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त नगदवाडी ता.जुन्नर,जि.पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतील इ.1ली...
जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलशेठ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त नगदवाडी ता.जुन्नर,जि.पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतील इ.1ली ते 7 वी मधील निराधार,गरीब,गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या 70 विद्यार्थ्यांना स्कूलबॅग व इ. 1 ली ते 10 वी मधील 300 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोऱ्हाडे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी BKT व बांगा टायर्स नारायणगावचे के.एस.बांगा तसेच कांदळी गावचे शिक्षणप्रेमी माजी आदर्श सरपंच बाळासाहेब शिवाजीराव बढे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलशेठ बेनके,रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष व युवा नेते अमितशेठ बेनके,BKT व बांगा टायर्सचे के.एस.बांगा, अनिल मालाणी,नगदवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख वनिता हांडे,न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक डॉ.दिपक घाडगे,ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे,विकास बढे,संकेत बढे,सुधीर फुलवडे,अभिजित बढे,नवनाथ नेंद्रे,पुष्कर ब्रह्मे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार अतुलशेठ बेनके,रोटरीचे अध्यक्ष अमितशेठ बेनके,संकेत बढे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,विद्या वाघ,आशा आरेकर,उज्वला कांबळे,स्मिता काळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले तर आभार निलेश शेलार यांनी मानले.




COMMENTS