दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या (CJP) 'संसद चलो' मोर्चदरम्यान (२०-२१ जुलै, २०२६) वातावर...
दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या (CJP) 'संसद चलो' मोर्चदरम्यान (२०-२१ जुलै, २०२६) वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून (Delhi Viral video) आंदोलकांवर, विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांवर, मोठ्या प्रमाणावर बलप्रयोग करण्यात आल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत (Delhi Viral video) असून पोलिसांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.(Delhi Viral video)
Delhi Viral video: महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तनाचा आरोप
सीजेपी (CJP) च्या नेतृत्वाने दिलेल्या माहितीनुसार, जंतरमंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अचानक मारहाण आणि लाठीचार्ज केला. महिला कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, पोलिसांकडून त्यांच्याशी अत्यंत गैरवर्तन करण्यात आले, केस खेचण्यात आले, कपडे फाडण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने बसमध्ये ढकलण्यात आले.
Delhi Viral video: पोलिसांनी मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला ; दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिसांनी सोमवारी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चातील तरुण आणि तरुणींना अमानुषपणे मारले. दिल्ली पोलिसांनी 12 वर्षांच्या मुलीचं डोकं फोडलं, 15-16 वर्षांच्या मुलींचे गळे पकडले होते. मी एका मुलीला पोलिसांनी (Delhi Police) मारताना स्वत: बघितले आहे. या मुलीचे कपडे पोलिसांनी फाडले आणि तिला छातीवर पाय देऊन मारले. एका मुलीच्या गळ्यावर पोलिसांनी काठीचे फटके मारले आहेत. त्यामुळे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना आंदोलनातील विद्यार्थ्यांचे खून करायचे आदेश देण्यात आले होते का? धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी (PM Modi) यांना आणखी मुलांचे खून करायचे आहेत का, असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी केला. ते मंगळवारी दिल्लीच्या जंतरमंतर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आम्हाला काल आमचा संसद मार्च मागे घ्यावा लागला. पोलिसांनी आणखी मुलांचं डोकी फोडू नयेत, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. सरकारला मुलांच्या जिवाची चिंता नाही हे काल समजले. काल दिल्ली पोलीस ज्याप्रकारे काठ्या फिरवत होते, मुलांची डोकी फोडत होते, यावरुन एक लक्षात येते की, त्यांना आदेश होता की, कोणाचा जीव गेला तरी चालेल, पण या लोकांना इतकं मारा की, पु्न्हा यांनी सरकारला प्रश्नच विचारले नाही पाहिजेत. पोलिसांना वॉटर कॅनन वापरता आले असते, पण पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले.


COMMENTS