बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खाननं त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये नायक, खलनायकासह विनोदी भूमिका सुद्धा साकारल्या आहे. ओमकारा सिने...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खाननं त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये नायक, खलनायकासह विनोदी भूमिका सुद्धा साकारल्या आहे. ओमकारा सिनेमातील त्यांचं निर्दयी लंगडा त्यागीचं पात्र प्रचंड गाजलं होतं.दरम्यान अशातच सैफने लंगडा त्यागीच्या शुटिंगवेळचा एक किस्सा शेअर केलाय.
सैफने नुकतीच द हॉलीवूड रिपोर्टर इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, ओमकारा सिनेमाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी एक वेगळीच मागणी केली होती. त्यांनी मला नग्न अवस्थेत शूट करण्यासाठी सांगितलं होतं. पंरतु मी स्पष्ट नकार दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होतीसैफ म्हणाला की, 'मला सिनमातील एक प्रसंग आठवतोय. आरशासमोर उभं राहून एक मोठा संवाद बोलायचा होता. तेव्हा मला दिग्दर्शक विशालजी म्हणालेले, हे दृश्य तू नग्न अवस्थेत करशील का? त्याची कल्पना फार वेगळी आणि रोमांचक होती. पंरतु सेटवर असल्यानं मला संकोच वाटत होता. तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुम्हीही दिग्दर्शन नग्न अवस्थेत करणार असाल तर मी हा सीन नग्न करेल. त्यावर ते मला 'मी तसं करणार नाही' असं म्हणाले. हा सगळा मजेशीर संवाद होता.' असं सैफने मुलाखतीत बोलताना सांगितलं..पुढे बोलताना सैफ म्हणाला, 'आता मला तो सीन नाकारल्याचं वाईट वाटतं. मी जर तो सीन केला असता तर काहीच अडचण नव्हती. ते मागून सावलीत चित्रीत करणार होतो. ते सिनेमात फार प्रवाही दिसलं असतं. पण आता जर मला तसा सीन करण्याची संधी मिळाली तर मी नक्की करेन' असं तो मुलाखतीत बोलताना म्हणाला


COMMENTS