मिरा-भाईंदरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. धावत्या दुचाकीवर अचानक झाड कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुण...
मिरा-भाईंदरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. धावत्या दुचाकीवर अचानक झाड कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.राहुल अशोक पाटील (वय ३५) असे या मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिरा-भाईंदरमधील राई गावात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस सुरू असताना राहुल हे आपल्या दुचाकीवरून जात होते. याच दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेले एक नारळाचे झाड अचानक त्यांच्या धावत्या दुचाकीवर कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की राहुल झाडाखाली पूर्णपणे चिरडले गेले आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.
दोन दिवस मृत्यूशी झुंज...
अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी अत्यंत तत्परता दाखवली. त्यांनी तातडीने धाव घेत राहुल यांना झाडाखालून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल केले. गेल्या दोन दिवसांपासून डॉक्टर राहुल यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. राहुल यांच्या अकाली जाण्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राई गाव आणि परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यातील अशा जीवघेण्या अपघातांमुळे स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षेबाबत नागरिकांमधून संतापही व्यक्त होत आहे.स्कूल बसवर झाड पडून लहानग्याचा मृत्यू...
मुंबईच्या चेंबूरमध्ये स्कुल बसवर झाड पडून एका चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. चेंबूर रोड क्रमांक ११ वरील झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून, या अत्यंत दुर्दैवी घटनेत काही शालेय विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाली. तर, विहान श्रीवास्तव या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेवरून महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला जात होता. विहानच्या मृत्यूनंतर धोकादायक झाडांची छाटणी सुरू करण्यात आली.


COMMENTS