जुन्नर तालुक्यातील रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायतचे सर्व सफाई कर्मचारी तसेच नारायणगाव परिसरातील सर्व वृत्त...
जुन्नर तालुक्यातील रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायतचे सर्व सफाई कर्मचारी तसेच नारायणगाव परिसरातील सर्व वृत्तपत्र वितरक यांना रेनकोटचे वाटप करण्यात आल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष अमित बेनके व फर्स्ट लेडी धनश्री बेनके यांनी दिली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष अमित बेनके,नारायणगावचे उपसरपंच व शिवसेना तालुकाप्रमुख योगेश ऊर्फ बाबुभाऊ पाटे,विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक व भाजप तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे,वारूळवाडीचे सरपंच विनायकभाऊ भुजबळ,ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटे,ह.भ.प.प्रभाकर महाराज फुलसुंदर व अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब नारायणगावचे योगेश भिडे,सचिन घोडेकर,मंगेश मेहेर,तेजस वाजगे,विवेक नाईक,प्रा.लहू गायकवाड,अनिता शिंदे,डॉ.केतकी काचळे,सिमा महाजन,छाया गायकवाड आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते व या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित बेनके,शिवसेना तालुकाप्रमुख योगेश पाटे,भाजप तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत महाजन यांनी केले तर आभार क्लबचे सचिव प्रसाद बांगर यांनी मानले.



COMMENTS