मुंबई: अन्नामध्ये भेसळ करणाऱ्या माफियांची झोप उडवणारे महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण मह...
मुंबई: अन्नामध्ये भेसळ करणाऱ्या माफियांची झोप उडवणारे महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारवाईचा धडाका लावला आहे.हॉटेल असो, दुध विक्रेते असो किंवा पॅकेजिंग फूड क्षेत्र असेल सगळ्याच ठिकाणी तुकाराम मुंढे यांचा नावाचा दरारा पाहण्यास मिळत आहे. तुकाराम मुंढे याांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांना अभिनेत्रा अनिल कपूर यांच्या नायक सिनेमाची उपमा दिली जात आहे. जर तुम्हाला नायक सिनेमासारखं 'एक दिन का सीएम'बनवलं तर काय कराल? असा प्रश्न विचारला असता मुंढे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं.
न्यूज १८ मराठीच्या डिजीटल पॉडकॉस्टमध्ये महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी पारदर्शक कारभार कसा असला पाहिजे, याबद्दल आपलं परखड मत व्यक्त केलं. या मुलाखतीत मुंढे यांना नायक सिनेमाबद्दल प्रश्न विचारला. तर मुंढे यांनी सांगितलं की, मी कधी कधी सिनेमे बघता, हिंदी आणि इंग्रजी बघतो.प्रश्न : तरीही लोक तुम्हाला नायक सिनेमातल्या हिरो सारखं समजतात?
तुकाराम मुंढे: मी शासकीय नोकर आहे, मला माझ्या मर्यादा माहीत आहे. लोक मला नायक म्हणत असले तरी मी त्यांचे आभार मानतो, ते मी चांगल्या हेतूने स्वीकार करतो.


COMMENTS