पँटच्या खिशात हात घातला अन् मृत्यूच्या दाढेत अडकला मुलगा, बीपी थेट झिरोवर, पावसाळ्यात घडला जीवघेणा प्रकार | CrimeNama
Loading ...

पँटच्या खिशात हात घातला अन् मृत्यूच्या दाढेत अडकला मुलगा, बीपी थेट झिरोवर, पावसाळ्यात घडला जीवघेणा प्रकार

  चंद्रपूर: पावसाळ्याच्या दिवसात विविध विषारी कीटकं, सरपटणारे प्राणी उब मिळावी, मानवी वस्त्यांमध्ये घरांमध्ये घुसतात. अशा वेळी केलेली एक छोट...

 


चंद्रपूर: पावसाळ्याच्या दिवसात विविध विषारी कीटकं, सरपटणारे प्राणी उब मिळावी, मानवी वस्त्यांमध्ये घरांमध्ये घुसतात. अशा वेळी केलेली एक छोटीशी चूक कशी जीवावर बेतू शकते, याचा थरारक प्रसंग चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आला आहे.घरात खुंटीला टांगलेल्या पँटच्या खिशात हात घातल्याने एक मुलगा थेट मृत्यूच्या दाढेत अडकला होता. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचे प्राण वाचवले आहेत.

नेमकं काय घडलं?



ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या विहीरगाव येथील आहे. मृत्यूच्या दाढेतून वाचलेल्या १२ वर्षीय मुलाचं नाव अनुप ईश्वर ढोणे असं आहे. चार दिवसांपूर्वी अनुपने घरात खुंटीला अडकवलेल्या पँटमध्ये हात घातला होता. मात्र हात घालताच त्याच्या हाताला आतमध्ये दडून बसलेल्या एका विंचवाने दंश केला.


विंचवाने दंश केल्यानंतर अनुपची तब्येत झपाट्याने खालावली आणि तो अत्यंत गंभीर अवस्थेत पोहोचला होता. विंचू चावल्यानंतर अनुपच्या पालकांनी त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेण्याऐवजी आधी गावातच घरगुती उपचार सुरू केले. पण अशा उपचारांमुळे मुलाची प्रकृती अधिकच खालावली आणि विष संपूर्ण शरीरात पसरून त्याचा बीपी शून्यावर आला. अखेर प्रकृती पूर्णपणे अत्यवस्थ झाल्यावर त्याला चंद्रपुरात हलवण्यात आले.

डॉ. आनंद बेंदले यांचे शर्थीचे प्रयत्न; ३ दिवस ICU मध्ये उपचार



मुलाची गंभीर अवस्था पाहता, डॉ. आनंद बेंदले यांनी तातडीने उपचार सुरू केले. सलग ३ दिवस अनुपवर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. डॉ. बेंदले आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न करून अखेर अनुपचे प्राण वाचवले. आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याच्यात वेगाने सुधारणा होत आहे.


विंचू किंवा साप चावल्यानंतर पहिला एक तास (गोल्डन अवर) अत्यंत महत्त्वाचा असतो. या घटनेत पालकांनी सुरुवातीला गावठी उपचार केल्याने मुलाचा जीव धोक्यात आला होता. त्याचा बीपी शून्यावर गेला होता. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण डॉक्टर वाचवू शकले. पावसाळ्याच्या दिवसांत कपडे किंवा बूट घालण्यापूर्वी ते नीट झटकून पाहावेत. घरात अंथरूण-पांघरूण घेताना किंवा खुंटीवरील कपडे वापरताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आलं आहे. 

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,90,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,5063,Buldhana,20,Chandrapur,6,Cooking,6,Crime,1912,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,102,Gadchiroli,6,Health,501,India,1090,Jalgaon,38,Jalna,23,Kolhapur,37,Lifestyle,411,Maharashtra,2234,Mumbai,550,Nagpur,80,Nashik,85,Politics,765,Politics.,8,Pune,2128,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,55,Sindhudurg,7,Solapur,55,Sport,80,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: पँटच्या खिशात हात घातला अन् मृत्यूच्या दाढेत अडकला मुलगा, बीपी थेट झिरोवर, पावसाळ्यात घडला जीवघेणा प्रकार
पँटच्या खिशात हात घातला अन् मृत्यूच्या दाढेत अडकला मुलगा, बीपी थेट झिरोवर, पावसाळ्यात घडला जीवघेणा प्रकार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgjC6Sj84kn8EJI3Gvhiq6vJlL7VfZBhh_am3JbVJi8jfRVP5NkPWtYzwvftC3JaJD-DRNccKWQrhk4UAqybzJmIDtT-ZLyQiiTPLh_wUXOalByGCNIP6Rpx8N16y7q_guUdAff577GxYDQtJ6xqGZ1gb8un-hvfRg0HI50QO7-GZvVGECN0lwEh3BV5Lo/s320/n718613381178332560594546bd84cff45b63d327d360154370d2173e1cec54cc4f270378e1e3c51d06703d.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgjC6Sj84kn8EJI3Gvhiq6vJlL7VfZBhh_am3JbVJi8jfRVP5NkPWtYzwvftC3JaJD-DRNccKWQrhk4UAqybzJmIDtT-ZLyQiiTPLh_wUXOalByGCNIP6Rpx8N16y7q_guUdAff577GxYDQtJ6xqGZ1gb8un-hvfRg0HI50QO7-GZvVGECN0lwEh3BV5Lo/s72-c/n718613381178332560594546bd84cff45b63d327d360154370d2173e1cec54cc4f270378e1e3c51d06703d.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_112.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_112.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content