परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात दूधभेसळीचा संशय निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाचे रबरसदृश घट्ट...
परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात दूधभेसळीचा संशय निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाचे रबरसदृश घट्ट पदार्थात रूपांतर झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.संबंधित दूध विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.
माहितीनुसार, पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील धारेश्वर संतोष भंगे यांनी सराफा बाजार परिसरातील एका खासगी दूध विक्रेत्याकडून अर्धा लिटर दूध खरेदी केले. घरी आणल्यानंतर दूध तापवण्यासाठी ठेवले असता काही वेळातच त्याचा रंग आणि पोत बदलू लागला. त्यानंतर दूध रबरसदृश घट्ट पदार्थात रूपांतरित झाल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून कुटुंबीयांना धक्का बसला. घटनेची माहिती तत्काळ पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. संशयित दुधाचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित दूध विक्रेत्याची चौकशी सुरू असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तपासात दुधात भेसळ अथवा अन्य अनियमितता आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. या घटनेनंतर शहरातील खासगी दूध विक्रीबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दूध विक्रेत्यांची नियमित तपासणी करून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. आता सर्वांचे लक्ष प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले आहे.परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात दूधभेसळीचा संशय निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाचे रबरसदृश घट्ट पदार्थात रूपांतर झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित दूध विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.


COMMENTS