राज्यात पुन्हा भूकंपाची शक्यता! शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत? दिल्ली-मुंबईत हालचालींना वेग | CrimeNama
Loading ...

राज्यात पुन्हा भूकंपाची शक्यता! शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत? दिल्ली-मुंबईत हालचालींना वेग

  महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत खळबळजनक घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र...

 


महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत खळबळजनक घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आगामी काळात भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होणार का?यावर पक्षांतर्गत अत्यंत गुप्त पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या संभाव्य राजकीय समीकरणाची चाचपणी करण्याची जबाबदारी पक्षाच्या एका अत्यंत ज्येष्ठ नेत्यावर सोपवल्याचे समजते.


सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे १० आमदार आणि ८ खासदार आहेत. केंद्रातील आणि राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, एनडीएला थेट सत्तेत सामील होऊन पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी, या दोन्ही पर्यायांवर पक्षांतर्गत चाचपणी सुरू आहे. या बड्या नेत्याने पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चर्चा १०० टक्के सुरू, विजय वडेट्टीवारांचा दावा



या संभाव्य राजकीय भूकंपावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत सूचक भाष्य केले आहे. वडेट्टीवार म्हणाले, "या विषयावर चर्चा १०० टक्के सुरू आहे. आता पाहावे हे लागेल की ते (पवार गट) विचारधारा सोडून सत्तेत जातात की विचारधारेची कास धरून काँग्रेससोबत राहतात."


पुढे बोलताना ते म्हणाले, "शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. जोपर्यंत त्यांच्याकडून आमच्याकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत आम्ही कसे ठरवणार? मात्र, त्यांच्या पक्षातील मोठ्या नेत्याने जर आम्हाला तसे संकेत दिले, तर आम्ही त्यांना आमच्यासोबतच राहण्यासाठी नक्कीच विनंती करू." वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत (MVA) सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

रोहित पवारांचा सत्तेत जाण्यास स्पष्ट नकार!



एकीकडे पडद्यामागे मोठ्या हालचाली आणि चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात असताना, शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी मात्र हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. रोहित पवार यांनी पक्षाची भूमिका मांडताना स्पष्ट केले की, "राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष हा पूर्णपणे शरद पवार यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी होणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले.पडद्यामागे नक्की काय शिजतंय?



रोहित पवारांचा नकार आणि काँग्रेस नेत्यांनी दिलेला दुजोरा पाहता, शरद पवार गटात या विषयावरून दोन मतप्रवाह तर नाहीत ना? अशी शंका राजकीय वर्तुळात उपस्थित केली जात आहे. जर शरद पवार गटाने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा पूर्णपणे कलाटणी मिळू शकते. आता संपूर्ण राज्याचे लक्ष शरद पवारांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4832,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1769,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,961,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,379,Maharashtra,2141,Mumbai,539,Nagpur,77,Nashik,85,Politics,752,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: राज्यात पुन्हा भूकंपाची शक्यता! शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत? दिल्ली-मुंबईत हालचालींना वेग
राज्यात पुन्हा भूकंपाची शक्यता! शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत? दिल्ली-मुंबईत हालचालींना वेग
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjeYGHtRsCgo0ZEfv3-sblQd9atzV4CPD7EMcEHQ759kAeta-WeX79Swd_9qcMSPcArZ805_4azWaV4a0bny6X9zDGI5yKuWdhcP9pNAWBwuS54naHA0deX3Tn5GIj5emgejItZ4AdeJqCuatroywgVzdKv7aB1SzsEP9IE7GDwk5hvobnAWxtQSAnoM2I/s320/n7187209461783412757989f0aab8a1907cedda8f43248aab8734d33f707821fd510dc284ac630f2a517153.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjeYGHtRsCgo0ZEfv3-sblQd9atzV4CPD7EMcEHQ759kAeta-WeX79Swd_9qcMSPcArZ805_4azWaV4a0bny6X9zDGI5yKuWdhcP9pNAWBwuS54naHA0deX3Tn5GIj5emgejItZ4AdeJqCuatroywgVzdKv7aB1SzsEP9IE7GDwk5hvobnAWxtQSAnoM2I/s72-c/n7187209461783412757989f0aab8a1907cedda8f43248aab8734d33f707821fd510dc284ac630f2a517153.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_07.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/blog-post_07.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content