महाराष्ट्रात गेल्या सात दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे अनेक गावांच्या संपर्क तुटला आहे. पूरस्थिती...
महाराष्ट्रात गेल्या सात दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे अनेक गावांच्या संपर्क तुटला आहे. पूरस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. सोमवारी पावसाने मुंबईसह पुणे, नाशिक शहरांना झोडपलं.सोमवारी 6 जुलैला मुंबई - पुण्याचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. रस्ता असो किंवा ट्रेन पुण्याकडे जाणारे सर्व मार्ग पावसामुळे ठप्प झाले होते. सोमवारी कनेक्टिंग लींकच्या बोगदा क्रमांक 2 च्या प्रवेशद्वारावर सोमवारी पहाटे अचानक दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे या मार्गावर अनेक वाहने अडकली होती. यात भयानक अनुभव एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीलाही आला. ही अभिनेत्री तब्बल 9 तास अडकली होती.
ही मराठी अभिनेत्रीचं नाव आहे धनश्री काडगांवकर असून तिने सोशल मीडियावर या भयानक अनुभवाचा एक पोस्टही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने सांगितलं की, माझ्यासाठी, मी नेहमीच दुसऱ्या बाजूला असायचे, जसे की मुसळधार पाऊस, एखादा अपघात किंवा भूस्खलनामुळे द्रुतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीच्या बातम्या पाहणं... पण काल 6 जुलै 2026 मी स्वतः त्याचाच एक भाग होते... अशा प्रकारे 9 तास अडकून पडणं खूपच थकवणारं आणि निराशाजनक होतं.अभिनेत्रीने सांगितलं की, मला मासिक पाळी आली होती, बाथरूमला जायची तीव्र इच्छा होती पण जाता येत नव्हतं... फूड कोर्टवर उतरायचं होतं आणि काहीतरी घ्यायचं होतं पण जमलं नाही...गुडघाभर पाणी साचलेलं, कुठे ओलं व्हा... आजारपण आत्ता परवडणारं नव्हतं , कारण खूप शूट लागलं होतं.
ती पुढे म्हणाली, माझा ड्रायव्हर मला बोलत होता... मॅडम आपण परत पुण्याला जाऊयात. पण, आम्ही कलाकार नेहमी कमिटमेंट पाळतो... टेलिकास्ट अडकला होता म्हणून, शेवटी मी हळुहळू का होईना पण सेटवर पोहोचले. निसर्गापुढे कोणाचं काहीच चालत नाही पण देवापुढं इतकीच प्रार्थना की, कोणाचं जगणं मुश्किल होईल इतकं मोठं आणि भयानक काही होऊ देऊ नकोस.


COMMENTS