काशी-नागपूर एक्स्प्रेसमध्ये नागपूरच्या महिलांचा विनयभंग, ट्रेनमध्ये हैवानांचा धुमाकूळ; 72 प्रवाशांच्या डब्यात घुसला 400 जणांचा जमाव | CrimeNama
Loading ...

काशी-नागपूर एक्स्प्रेसमध्ये नागपूरच्या महिलांचा विनयभंग, ट्रेनमध्ये हैवानांचा धुमाकूळ; 72 प्रवाशांच्या डब्यात घुसला 400 जणांचा जमाव

  नागपूर: काशीहून नागपूरकडे परतणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रवासादरम्यान अत्यंत किळसवाणा आणि धक्कादायक अनुभव आल्याची संत...

 


नागपूर: काशीहून नागपूरकडे परतणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रवासादरम्यान अत्यंत किळसवाणा आणि धक्कादायक अनुभव आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचा आणि समाजकंटकांनी डब्यात अक्षरशः हौदोस घातल्याचा प्रकार घडला आहे.हा संपूर्ण थरार आणि त्रास सांगताना पीडित महिलांना नागपुरात पोहोचल्यावर रडू कोसळले.


72 प्रवाशांच्या डब्यात 400 जणांचा जमाव


संबंधित पीडित प्रवाशांनी 3 ते 4 महिने आधीच या गाडीचे आरक्षण केले होते. मात्र वाराणसी स्टेशनवर गाडी आली असता, तेथे आधीच प्रचंड गर्दी होती. 72 प्रवाशांची क्षमता असलेल्या आरक्षित डब्यामध्ये 400 हून अधिक लोकांचा अनधिकृत जमाव बळजबरीने घुसला. या प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना गाडीत शिरणेही कठीण झाले होते.


महिलांचा विनयभंग आणि अश्लील शेरेबाजी

गाडीत प्रवेश करत असताना गर्दीचा गैरफायदा घेत काही हुल्लडबाजांनी महिलांच्या अंगाला स्पर्श करत त्यांचा विनयभंग केला. डब्यात शिरल्यानंतरही महिलांना सातत्याने छेडछाड आणि अश्लील शेरेबाजीला तोंड द्यावे लागले. काही पुरुषांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, हुल्लडबाजांनी त्यांच्यावर हातही उगारल्याचे प्रवाशांनी सांगितले.


तक्रार करूनही रेल्वे यंत्रणा सुस्त

प्रवासादरम्यान घडणाऱ्या या गंभीर प्रकाराची माहिती प्रवाशांनी रेल्वेच्या '१३९' या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून दिली. इतकेच नव्हे तर रेल्वेच्या 'एक्स' खात्यावरही ऑनलाइन तक्रार नोंदवण्यात आली. मात्र दोन्ही ठिकाणी दाद मागूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही तत्पर कारवाई करण्यात आली नाही.


पोलिसांची हतबलता आणि नैनी स्थानकावर रेल्वे रुळांवर आंदोलन

या त्रासाला आणि अश्लील शेरेबाजीला कंटाळून अखेर महिलांच्या संयमाचा बांध सुटला. त्यांनी नैनी स्थानक गाठताच थेट गाडीसमोर आणि रेल्वे रुळांवर उतरून तीव्र आंदोलन सुरू केले. यानंतर उत्तर प्रदेश रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली असता, त्यांनी "इथे गर्दी फार आहे, आम्ही काही करू शकत नाही आणि डब्याच्या आत येऊ शकत नाही," अशी हतबलता व्यक्त करत हात वर केले.


नागपूर पोलिसांचीही बेफिकिरी

या भीषण मनस्तापातून कसेबसे नागपुरात पोहोचलेल्या पीडित प्रवाशांना येथेही प्रशासकीय बेजबाबदारपणाचा सामना करावा लागला. नागपुरात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता 'नोंदवलेली तक्रार उत्तर प्रदेशात जाऊन द्या', असे सांगत नागपूर पोलिसांनी बेफिकिरी दाखवली. रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचे धिंडवडे काढणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4846,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1776,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,969,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2147,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,754,Politics.,7,Pune,2070,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: काशी-नागपूर एक्स्प्रेसमध्ये नागपूरच्या महिलांचा विनयभंग, ट्रेनमध्ये हैवानांचा धुमाकूळ; 72 प्रवाशांच्या डब्यात घुसला 400 जणांचा जमाव
काशी-नागपूर एक्स्प्रेसमध्ये नागपूरच्या महिलांचा विनयभंग, ट्रेनमध्ये हैवानांचा धुमाकूळ; 72 प्रवाशांच्या डब्यात घुसला 400 जणांचा जमाव
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBjR1vhgReOunfOzdYFHgHz7DIvU1wdrq4Yd2jVbYHQcRdPAb8ouWMke7HQcpS4C0Co0148qMvgsXI_upGhP2TsQR9k17m0ydYeH_fzzGQZbjEq0nWdnLkRSYlyzlKAJVTg7wll06WCou07KQa_duohIleNsX2PxKbrBl0EAA-w3VoGaFoNR6axc0116c/s320/n7187552201783427061671b57e4178be8884546f86b59c5aab688d4c1a4d44dd7b0e99ce6f96c253f1b3eb.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBjR1vhgReOunfOzdYFHgHz7DIvU1wdrq4Yd2jVbYHQcRdPAb8ouWMke7HQcpS4C0Co0148qMvgsXI_upGhP2TsQR9k17m0ydYeH_fzzGQZbjEq0nWdnLkRSYlyzlKAJVTg7wll06WCou07KQa_duohIleNsX2PxKbrBl0EAA-w3VoGaFoNR6axc0116c/s72-c/n7187552201783427061671b57e4178be8884546f86b59c5aab688d4c1a4d44dd7b0e99ce6f96c253f1b3eb.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/07/72-400.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/07/72-400.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content