भारतासह संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय वंशाचा व्यावसायिक गौरव श्रीवास्तवने एक आंतरराष्ट्रीय महाघो...
भारतासह संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय वंशाचा व्यावसायिक गौरव श्रीवास्तवने एक आंतरराष्ट्रीय महाघोटाळा केला आहे. त्याने इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि तत्कालीन संरक्षण मंत्री प्रबोवो सुबियांतो यांची तब्बल ४२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे.'ऑर्गनाइझ्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट' (OCCRP) आणि इंडोनेशियाई मासिक 'टेम्पो'च्या संयुक्त अहवालातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गौरव श्रीवास्तवने स्वतःला अमेरिकन गुप्तहेर संस्था 'सीआयए'चा एजंट असल्याचं सांगून प्रबोवो सुबियांतो यांचा विश्वास संपादन केला. संरक्षण करारांच्या नावाखाली ४२५ कोटी रुपयांचे बनावट कर्ज मंजूर करून घेतलं. अहवालानुसार, गौरवने इंडोनेशिया सरकारला ३६ F-15 लढाऊ विमाने, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि मिलिटरी कमांड सिस्टिम मिळवून देण्याचं खोटं आश्वासन दिलं होतं. केवळ ३६ F-15 लढाऊ विमानांचा संभाव्य करारच सुमारे १.३२ लाख कोटी रुपयांचा होता.
तपासात उघड झाले की, ज्या चार कंपन्यांद्वारे गौरवने पाच संरक्षण करार मिळवले होते, त्या सर्व बनावट कंपन्या होत्या. नंतरच्या काळात कर न भरल्यामुळे या कंपन्या बंद करण्यात आल्या. हा सर्व कथित घोटाळा २०२० ते २०२२ दरम्यान झाला. याच फसवणुकीच्या पैशातून गौरवने लॉस एंजिलिसमध्ये सुमारे २०८ कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केल्याचा आरोप आहे.
गौरवने प्रबोवो सुबियांतो यांचा इतका प्रचंड विश्वास जिंकला होता की, प्रबोवो त्याला आदराने 'मिस्टर जी' असे म्हणत असत. गौरवने असाही दावा केला होता की, त्याने २००२ च्या बाली बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांना पकडण्यात मदत केली होती, तसेच प्रबोवो यांचे नाव अमेरिकन इमिग्रेशनच्या ब्लॅकलिस्टमधून काढण्यास मदत केली होती.
जेम्स बॉन्डसारख्या खोट्या कथा
अमेरिकेत दाखल खटल्यानुसार, गौरव लोकांना स्वतःच्या शरीरावरील खुणा दाखवून सांगायचा की, २००८ मध्ये काँगोमधील एका मोहिमेदरम्यान 'आयसिस'ने त्याला ओलीस ठेवलं होतं आणि या खुणा त्याच वेळच्या जखमा आहेत. त्याने सीआयएच्या 'द फार्म' या प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षण घेतल्याचा दावाही केला होता. मात्र, चौकशीत समोर आले की, त्याच्या शरीरावरील खुणा कोणत्याही गुप्त मोहिमेच्या नसून, त्याच्या बालपणात झालेल्या किडनीच्या शस्त्रक्रियेच्या होत्याइंडोनेशिया सरकारचे काय म्हणणे आहे?
या संपूर्ण प्रकरणावर इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रिको सिराइत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितले की, "ज्या संरक्षण करारांवर चर्चा झाली होती, ते अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे इंडोनेशिया सरकारचे कोणतेही थेट आर्थिक नुकसान झालेले नाही." दरम्यान, गौरव श्रीवास्तवच्या विरोधात २०२४ पासून अमेरिकेतही फसवणुकीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, आता त्याच्या आंतरराष्ट्रीय कारवाया जगासमोर आल्या आहेत..


COMMENTS