Pune Rain News Updates : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम.... म्हणत दरवर्षी आनंदीतून आनंदाच्या उत्सवात पालखी पंढरपूरच्या द...
वारकऱ्यांना आनंदीत 'नो एन्ट्री'
वारी सुरू होण्याच्या 48 तास आधीच वारकऱ्यांना आनंदीत 'नो एन्ट्री' देण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना आता आळंदीत येता येणार नाही. पावसामुळे आनंदीकडे येणारे चारही पूल बंद झाले असून आळंदीचा संपर्क तुटला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे कडक आवाहन केलं आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापुराचे रूप धारण केल्याने आता आषाढी वारीवर देखील मोठं संकट कोसळलंय.अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव
आळंदीतील वादळी पावसामुळे झाड कोसळल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत रस्ता मोकळा केला आहे. तसेच आळंदी व संवेदनशील भागात पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली होती, पण पावसाने पुन्हा खोडा घातला. बई-पुणे मार्गावरील दरड कोसळल्याने एसटी सेवा बंद करण्यात आली असून राज्यातील अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पहायला मिळतंय.
आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये - प्रशासन
प्रशासनाने विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे 250 वारकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवलं होतं. तिथं देखील पाण्याने विळखा घातल्याची माहिती समोर आली होती. नदीकाठी उभारण्यात आलेले चेंजिंग रूम आणि तात्पुरत्या सुविधा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावे व आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली
इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. कृपया प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावं, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


COMMENTS