जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये भारतातील उद्योजग मुकेश अंबानी यांचा सहभाग आहे. त्याचे राहणीमान, खानपान कायमच सर्वांचे लक्ष वेधून...
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये भारतातील उद्योजग मुकेश अंबानी यांचा सहभाग आहे. त्याचे राहणीमान, खानपान कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मुंबईतील त्यांच्या आलिशाय घरात शंभर पेक्षा जास्त कामगार कामाला आहेत.त्यामुळे आता अंबानी कुटुंबीयांच्या जेवणात कोणते पदार्थ असतात? त्याची किंमत किती? जाणून घ्या...
मुंबईत अंबानी कुटुंबीय आणि सेलिब्रिटी कुठून शॉपिंग करतात याचा व्हिडीओ एका इन्फ्लूएंसरने शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये त्याने अनेक देशांतून येणाऱ्या भाजीपाल्याची किंमत सांगितली आहे.
इन्फ्लूएंसरने दाखवले की 2000 रुपये किलो बटाटे, 1200 रुपये किलो स्पेनवरुन आलेले कांदे, काळ्या रंगाचा मका जो अफ्रिकेमधून आला आहे त्याची किंमत 4000 रुपये किलो आहे.
एक किलो तांदळाची किंमत 600 रुपये आहे. फ्रान्सवरुन आलेले सफरचंद हे 450 रुपयाचे दोन आहेत. 100 ग्रॅम पेक्षा कमी असलेले आलं 350 रुपयांना मिळते. हे आलं नेदरलँडवरुन येते.
थायलंड येथील आणलेली लाल मिरची 2000 रुपये किलो आहे. पिवळी आणि लाल छोटी सिमला मिरची ही बाजारात थोड्या कमी दरात मिळते. पण मार्टमध्ये मोरोक्कोवरुन आणलेली सिमला मिरची 1250 रुपये पाव किलो आहे म्हणजेच 5000 रुपये किलो आहे. अंबानींच्या घरातील भाजीपाला याच ठिकाणाहून येत असल्याचे इन्फ्लूएंसरने म्हटले आहे.


COMMENTS