Video: एका व्हायरल व्हिडिओनं ८२ वर्षीय मनसुख काकाचं आयुष्य बदललं; ५ दिवसांत तब्बल किती कमावले? | CrimeNama
Loading ...

Video: एका व्हायरल व्हिडिओनं ८२ वर्षीय मनसुख काकाचं आयुष्य बदललं; ५ दिवसांत तब्बल किती कमावले?

सध्याच्या काळात सोशल मिडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. यात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे अनेक जण रातोरात प्रसिद्धीच्या झोतात ये...



सध्याच्या काळात सोशल मिडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. यात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे अनेक जण रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येतात. अलीकडेच मुंबईतील ८२ वर्षीय मनसुख काका यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.तुम्हीदेखील त्यांचा व्हिडिओ इन्स्टाग्राम रिलमध्ये पाहिला असेल. ज्या वयात लोक निवृत्ती घेऊन आरामात आयुष्यात जगतात त्या वयात मनसुख काका जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. रस्त्याच्या कडेला एक छोटासा स्टॉल लावून १२ तास तिथे उभं राहून ते घरगुती स्नॅक्स विक्रीचा व्यवसाय करतात. कंटेंट क्रिएटर आराधना चॅटर्जीने तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून मनसुख काका यांची कहाणी जगासमोर आणली. ५ दिवसांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ जवळपास २१ मिलियन लोकांनी पाहिला. या व्हायरल व्हिडिओनंतर मनसुख काकांचे आयुष्य बदलले आहे.


हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मनसुख काका यांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. ही मदत ४ लाखांपर्यंत जमली. त्यानंतर आराधना हिने ४ लाखांचा चेक मनसुख हिरेन यांच्याकडे सुपूर्द केला. आलेल्या पैशातून व्यवसाय आणखी मोठा करणार असल्याचं मनसुख काका यांनी सांगितले. जेव्हा आराधना हिने मनसुख काकांना आर्थिक मदतीचा चेक दिला तेव्हा मनसुख काकांच्या डोळ्यातून अश्रू आले. मनसुख काकांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यापासून त्यांच्याकडे माल खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढली.




अनेकदा ग्राहक त्यांच्या स्टॉलला भेट देतात आणि सर्व माल खरेदी करून घेऊन जातात. त्याशिवाय मनसुख काका यांच्या घरगुती फरसाणासाठी आता दर महिन्याला ग्राहक जोडले गेले आहेत त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला सातत्य येणार आहे. मनसुख काका त्यांच्या व्यवसायासाठी खरेदी विक्री यासाठी डायरी लिहितात. त्यात दिवसाला किती विक्री झाली याचा उल्लेख असतो. मनसुख काकांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या व्यवसायात तेजी आली. दररोजच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ११ तारखेला ३ वस्तू विकल्या गेल्या. १२ तारखेला २०० रूपयांचा व्यवसाय झाला मात्र १५ तारखेनंतर त्यांचा सर्व माल विक्री होऊ लागला असं मनसुख काकांनी सांगितले.


आराधनाने दिलेल्या माहितीनुसार, मनसुख काका अनेक वर्षे एका साडीच्या दुकानात सेल्समॅन म्हणून काम करत होते. परंतु कोरोना काळात त्यांची तब्येत बिघडली आणि आजारपणामुळे त्यांना ती नोकरी सोडावी लागली. याच काळात त्यांच्या मुलालाही वडिलांची काळजी घेण्यासाठी स्वतःची नोकरी सोडावी लागली होती. पण बरं झाल्यानंतर मनसुख काकांनी हार मानली नाही. कुटुंबावर ओझं बनण्याऐवजी त्यांनी आपल्या घराजवळच एक छोटासा स्टॉल लावून पुन्हा एकदा काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. मनसुख काका त्यांच्या स्टॉलवर खाकरा, चकली आणि फरसाणसह जवळपास २० प्रकारचे घरगुती फरसाण विक्री करतात. हे सर्व स्नॅक्स मनसुख काका यांची बहीण घरी तयार करते. त्यानंतर ते पॅक करून स्टॉलवर आणलं जातं, जिथे मनसुख काका दिवसभर ग्राहकांची वाट पाहत बसतात.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4751,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1747,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,496,India,941,Jalgaon,37,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,369,Maharashtra,2092,Mumbai,532,Nagpur,75,Nashik,83,Politics,727,Politics.,7,Pune,2053,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,76,Technology,57,World,120,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: Video: एका व्हायरल व्हिडिओनं ८२ वर्षीय मनसुख काकाचं आयुष्य बदललं; ५ दिवसांत तब्बल किती कमावले?
Video: एका व्हायरल व्हिडिओनं ८२ वर्षीय मनसुख काकाचं आयुष्य बदललं; ५ दिवसांत तब्बल किती कमावले?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEil1ATT2tGyDC7fNVoU6_QL-QQ_040YBIgqC0_vyaC-DDmvWMcyf3Zuj8ZTeYOocvT3zYb6KlMZqrgItoqKLgYhPg2uiGf7Mp_MtepODdWznynaPdAVhzN3TdDY2TSc0-jjtTDULWRc3a1FA0kbaOwhGIPgpQ6g0vl9AWeHHu_RFSVFbYxMdBz2UWGEWF0/s320/n71675983017819605517271b816adcc434860c0d76201e69a206419bf777236f7306ae26b6faf787c7924e.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEil1ATT2tGyDC7fNVoU6_QL-QQ_040YBIgqC0_vyaC-DDmvWMcyf3Zuj8ZTeYOocvT3zYb6KlMZqrgItoqKLgYhPg2uiGf7Mp_MtepODdWznynaPdAVhzN3TdDY2TSc0-jjtTDULWRc3a1FA0kbaOwhGIPgpQ6g0vl9AWeHHu_RFSVFbYxMdBz2UWGEWF0/s72-c/n71675983017819605517271b816adcc434860c0d76201e69a206419bf777236f7306ae26b6faf787c7924e.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/video.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/video.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content