Iran recovery of 1000 missiles CNN : मध्य-पूर्वेतील (Middle East) युद्धाच्या आगीत एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक वळण समोर आले आहे. अमेरिक...
Iran recovery of 1000 missiles CNN : मध्य-पूर्वेतील (Middle East) युद्धाच्या आगीत एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक वळण समोर आले आहे.
अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणची लष्करी कंबर तोडण्यासाठी ४० दिवसांत तब्बल १३,५०० हून अधिक बॉम्ब हल्ले केले होते. इराणचे क्षेपणास्त्र तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा पाश्चात्त्य माध्यमांकडून केला जात होता. परंतु, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था 'CNN' ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या रिपोर्टने अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाला म्हणजेच पेंटागॉनला मोठा धक्का दिला आहे. इराणने कोणत्याही हाय-टेक तंत्रज्ञानाचा वापर न करता, केवळ साध्या बुलडोझर आणि डंप ट्रकच्या मदतीने आपले उद्ध्वस्त झालेले बोगदे पुन्हा खोदून काढले आहेत आणि ढिगाऱ्याखालून १,००० हून अधिक प्राणघातक क्षेपणास्त्रे सुरक्षितपणे जप्त केली आहेत.
२० वर्षांच्या पूर्वतयारीने अमेरिकेला चारले खडे!
हॅम्बर्ग विद्यापीठातील 'शांतता संशोधन आणि सुरक्षा धोरण संस्थेचे' वरिष्ठ संशोधक तिमूर कादिशेव, जे गेल्या अनेक वर्षांपासून इराणी लष्करी क्षेपणास्त्रांचा सखोल अभ्यास करत आहेत, त्यांनी सीएनएनशी बोलताना एक महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, 'इराण आजच्या युद्धाची तयारी काल-परवापासून करत नव्हता, तर ते गेल्या २० वर्षांपासून अशा प्रकारच्या संभाव्य महायुद्धाच्या तयारीमध्ये होते.' अमेरिकेने इराणचे बोगदे ढिगाऱ्यात बदलण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची अत्यंत अत्याधुनिक आणि महागडी शस्त्रे वापरली. मात्र, इराणने तो ढिगारा साफ करण्यासाठी अत्यंत साधे आणि स्वस्त तंत्रज्ञान म्हणजेच बुलडोझर वापरले. हा अमेरिकेच्या युद्धनीतीला मिळालेला मोठा शह मानला जात आहे.


COMMENTS