महाराष्ट्र कॅडरचे सम्मानित IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची मंगळवारी नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. 26/11 चे हिरो म्...
महाराष्ट्र कॅडरचे सम्मानित IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची मंगळवारी नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. 26/11 चे हिरो म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. नांगरे पाटील हे रविंदर सिंगल यांची जागा घेणार आहेत. त्यांची बदली महाराष्ट्र अँटी-करप्शन ब्यूरोमध्ये एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पदावर झाली आहे. 1997 बॅचचे अधिकारी नांगरे पाटील, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी अतिरेक्यांचा मुकाबला करुन जे शौर्य दाखवलं होतं, त्यासाठी ओळखले जातात.
हे जाणून घ्यायचं आहे. जर नाही, तर सरकार त्यांच्याविरोधात कारवाई करणार आहे का?.
“जे आयपीएस अधिकारी RSS, हिंदुत्व आणि आरएसएसचे संस्थापक के.बी. हेडगेवार यांचं कौतुक करतात त्यांची अशी भाषणं नियमांविरुद्ध आहे” असं काँग्रेसने म्हटलं आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी राजकीय दृष्टया तटस्थ असलं पाहिजे आणि आपल्या पदाच्या हिशोबाने आचरण केलं पाहिजे असं All India Services सेसचे नियम सांगतात. नियमांनी अधिकाऱ्यांना कुठल्याही राजकीय विचारधारेशी जोडण्यास मनाई केली आहे. आरएसएस सारख्या संघटनेच्या मंचावर जाऊन त्यांचं कौतुक करणं हे नियमांचं उल्लंघन नाहीय का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.
हा मुद्दा फक्त एका अधिकाऱ्यापुरता मर्यादीत नाही. सिविल सर्विसेजची विश्वासहर्ता, राजकीय निष्पक्षतेचे संवैधानिक सिद्धांत आणि पोलीस प्रशासनावरील जनतेचा विश्वास याच्याशी संबंधित हे मुद्दे आहेत. सामाजिक विभाजनाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांचं उद्दातीकरण नव्हे, तर कायदा-सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे असं दुसऱ्या एका पोस्टमध्ये विरोधी पक्षाने म्हटलं आहे.


COMMENTS