Mosquito Project : 3.2 कोटी डास सोडण्याची परवानगी मागतंय गुगल; पण का? नेमकं काय आहे असं करण्यामागचं कारण? | CrimeNama
Loading ...

Mosquito Project : 3.2 कोटी डास सोडण्याची परवानगी मागतंय गुगल; पण का? नेमकं काय आहे असं करण्यामागचं कारण?

  मुंबई: पावसाळा सुरू झाला की डासांचा त्रास वाढू लागतो. रात्रीची झोप उडवणाऱ्या या छोट्या कीटकांमुळे केवळ चिडचिड होत नाही, तर अनेक गंभीर आजार...

 



मुंबई: पावसाळा सुरू झाला की डासांचा त्रास वाढू लागतो. रात्रीची झोप उडवणाऱ्या या छोट्या कीटकांमुळे केवळ चिडचिड होत नाही, तर अनेक गंभीर आजारांचाही धोका निर्माण होतो. जगभरातील आरोग्य संस्था डासांमुळे पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाय शोधत आहेत.

मात्र आता या लढाईत तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलच्या मूळ कंपनीने एक अनोखी योजना समोर आणली आहे. ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे, सोबतच गुगल असं का करणार आहे? असा प्रश्न देखील उपस्थीत झाला आहे.


लाखो डास सोडण्यामागचा उद्देश काय?

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या लाइफ सायन्सेस विभागाने काही वर्षांपूर्वी डिबग नावाचा विशेष प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाचा उद्देश डासांमुळे पसरणाऱ्या धोकादायक रोगांवर नियंत्रण मिळवणे हा आहे. यासाठी कंपनीने अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा राज्यांमध्ये पुढील दोन वर्षांत तब्बल 32 दशलक्ष म्हणजेच 3.2 कोटी विशेष डास सोडण्याची परवानगी मागितली आहे.


या योजनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोडले जाणारे डास हे नर डास असतील. विशेष म्हणजे नर डास माणसांना चावत नाहीत. फक्त मादी डास रक्त शोषतात आणि त्यांच्यामार्फत अनेक रोग पसरतात. त्यामुळे या प्रकल्पामुळे नागरिकांच्या डास चावण्याच्या समस्येत वाढ होणार नाही.


मग हे डास करणार तरी काय?

या डासांमध्ये वोल्बाशिया (Wolbachia) नावाचा नैसर्गिक जीवाणू असतो. जेव्हा हे संक्रमित नर डास जंगलातील किंवा नैसर्गिक वातावरणातील मादी डासांशी संयोग करतात, तेव्हा तयार होणारी अंडी उबवत नाहीत. परिणामी पुढील पिढीतील डास जन्मालाच येत नाहीत आणि हळूहळू त्या भागातील डासांची संख्या कमी होऊ लागते.


या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वेस्ट नाईल व्हायरस आणि सेंट लुईस एन्सेफलायटिससारख्या डासांमुळे पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळवणे हा आहे. विशेषतः वेस्ट नाईल व्हायरस हा अमेरिकेतील सर्वाधिक आढळणाऱ्या डासजन्य रोगांपैकी एक मानला जातो. त्यामुळे डासांची संख्या कमी करणे हा या समस्येवर उपाय म्हणून पाहिला जात आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोट्सची मदत

लाखो डासांची पैदास करणे आणि त्यातील फक्त नर डास निवडणे हे अत्यंत जटिल काम आहे. यासाठी कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अत्याधुनिक रोबोट्स आणि स्वयंचलित यंत्रणांचा वापर करत आहे. विशेष सिस्टीमच्या मदतीने नर आणि मादी डास वेगळे केले जातात. त्यानंतर योग्य ठिकाणी या डासांचे नियंत्रित पद्धतीने वितरण केले जाते.


यापूर्वी अमेरिकेतील काही भागांमध्ये अशाच प्रकारचे मर्यादित प्रयोग करण्यात आले होते. त्या प्रयोगांमध्ये डासांच्या लोकसंख्येत लक्षणीय घट झाल्याचे आढळले होते. आता हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर राबवण्याची तयारी सुरू आहे. मंजुरी मिळाल्यास पहिल्या वर्षात प्रत्येक राज्यात 16 दशलक्ष आणि दुसऱ्या वर्षात आणखी 16 दशलक्ष डास सोडले जाऊ शकतात.


डासांवर नियंत्रण मिळवण्याची नवी दिशा

डास मारण्यासाठी औषधांची फवारणी किंवा रासायनिक उपाय यांवर अवलंबून राहण्याऐवजी आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने डासांची संख्या नैसर्गिकरीत्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला, तर भविष्यात जगभरातील डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही पद्धत एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकते.

COMMENTS

Name

Agriculture,83,Ahmednagar,86,Amaravati,20,Aurangabad,39,Breakin,1,Breaking,4360,Buldhana,17,Chandrapur,2,Cooking,4,Crime,1610,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,77,Gadchiroli,5,Health,469,India,819,Jalgaon,34,Jalna,19,Kolhapur,27,Lifestyle,348,Maharashtra,1860,Mumbai,456,Nagpur,57,Nashik,73,Politics,650,Pune,1966,Raigad,27,Ratnagiri,20,Sangali,36,Satara,50,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,68,Technology,39,World,77,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: Mosquito Project : 3.2 कोटी डास सोडण्याची परवानगी मागतंय गुगल; पण का? नेमकं काय आहे असं करण्यामागचं कारण?
Mosquito Project : 3.2 कोटी डास सोडण्याची परवानगी मागतंय गुगल; पण का? नेमकं काय आहे असं करण्यामागचं कारण?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAM1eZB6dp7Xk41P2wZP2yQeGdh8fFsZ_shtXdfyPdTcB_HLOLx5-9t9pCKTSmOWXm_Fjfz_ikU_AvR925bb3H6Py7cdmDE9n17vDx7XKPNceUWEwQBo-PdjQLHIDzbkkaNy5aLL-ov5g56oejxm4Bp4ardiBmZ9HOyJldXWMY11OW7S1rvwQXxQJ1JvA/s320/n714591206178045431025477698547883a20e60fb442731614caf0374a16b35fae5f9e8df0dc55bfc71f29.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAM1eZB6dp7Xk41P2wZP2yQeGdh8fFsZ_shtXdfyPdTcB_HLOLx5-9t9pCKTSmOWXm_Fjfz_ikU_AvR925bb3H6Py7cdmDE9n17vDx7XKPNceUWEwQBo-PdjQLHIDzbkkaNy5aLL-ov5g56oejxm4Bp4ardiBmZ9HOyJldXWMY11OW7S1rvwQXxQJ1JvA/s72-c/n714591206178045431025477698547883a20e60fb442731614caf0374a16b35fae5f9e8df0dc55bfc71f29.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/mosquito-project-32.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/mosquito-project-32.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content