राजीनामा द्या आणि भाजपमध्ये सामील व्हा! डॅशिंग IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील राज ठाकरेंच्या निशाण्यावर का? | CrimeNama
Loading ...

राजीनामा द्या आणि भाजपमध्ये सामील व्हा! डॅशिंग IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील राज ठाकरेंच्या निशाण्यावर का?

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं. एका सरकारी नोकरीत असलेल्या, त्य...



आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं. एका सरकारी नोकरीत असलेल्या, त्यातही अत्यंत जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने अशा कार्यक्रमात जाऊन एका विशिष्ट संघटनेबद्दल जाहीरपणे निष्ठा दाखवणे कितपत योग्य आहे, असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.नांगरे पाटील यांनी दाखवलेली ही दुहेरी निष्ठा त्यांच्या निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून जर त्यांना संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन भाजप किंवा संघात सामील व्हावं असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केला आहे.


अशा प्रकारच्या राजकीय हेतू असलेल्या संमेलनांमध्ये पोलीस अधिकार्‍यांचे जाणे आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावर मौन बाळगणे हे भविष्यासाठी अत्यंत चुकीचे पायंडे पाडणारे आहे. २०१२ मध्ये मनसेच्या मोर्चात पोलिसांचे अभिनंदन करणाऱ्या एका कॉन्स्टेबलला तत्कालीन सरकारने तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवले होतं, मग तोच नियम नांगरे पाटील यांना का लागू केला जात नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.


विश्वास नांगरे पाटील यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती केली आणि त्यावरुन राजकीय वाद सुरू झाला आहे. यावरुन काँग्रेस देखील आक्रमक झालं असून खाकी वर्दीतला अधिकारी की संघाचा प्रचारक? असा सवाल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.


काय म्हणाले राज ठाकरे?

''आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

COMMENTS

Name

Agriculture,97,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4806,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1765,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,497,India,952,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,374,Maharashtra,2126,Mumbai,536,Nagpur,77,Nashik,85,Politics,741,Politics.,7,Pune,2061,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,123,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: राजीनामा द्या आणि भाजपमध्ये सामील व्हा! डॅशिंग IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील राज ठाकरेंच्या निशाण्यावर का?
राजीनामा द्या आणि भाजपमध्ये सामील व्हा! डॅशिंग IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील राज ठाकरेंच्या निशाण्यावर का?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9fvCrKUFoI0luFMzRnqlzBBWPrJffvV9fRyLCJ7hvJavXyTBGWPVgW_hkp-KMvgIpFKxIItH_-TiEiM9D3742_U40Ubj9AuxXQhdbcjZfUoYToSjxxerd3DovIzpGHRiTrdGBZ5Gn5GUF5VwMwFs0WNsG1rjqqp0idbO8_R5IOoGfe7YCbjqQdr1Zyho/s320/IMG_20260627_121515.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9fvCrKUFoI0luFMzRnqlzBBWPrJffvV9fRyLCJ7hvJavXyTBGWPVgW_hkp-KMvgIpFKxIItH_-TiEiM9D3742_U40Ubj9AuxXQhdbcjZfUoYToSjxxerd3DovIzpGHRiTrdGBZ5Gn5GUF5VwMwFs0WNsG1rjqqp0idbO8_R5IOoGfe7YCbjqQdr1Zyho/s72-c/IMG_20260627_121515.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/ips_0492012314.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/ips_0492012314.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content