इंजिनिअर बनून IPS महिला अधिकारी पबमध्ये घुसली! मोबाईल काढला अन्... हाय-प्रोफाईल रॅकेट पकडलं | CrimeNama
Loading ...

इंजिनिअर बनून IPS महिला अधिकारी पबमध्ये घुसली! मोबाईल काढला अन्... हाय-प्रोफाईल रॅकेट पकडलं

 एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल अशी पोलिसांची थरारक कामगिरी तेलंगणामधील सायबराबादमध्ये पाहायला मिळाली. सायबराबादच्या कुकटपल्ली झोनच...



 एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल अशी पोलिसांची थरारक कामगिरी तेलंगणामधील सायबराबादमध्ये पाहायला मिळाली. सायबराबादच्या कुकटपल्ली झोनच्या डीसीपी रिती राज यांनी स्वतः साध्या वेषात एका पबवर धाड टाकली आणि तिथे सुरू असलेल्या एका मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला.एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने स्वतः फिल्डवर उतरून केलेल्या या धाडसी कारवाईमुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कुकटपल्ली येथील किंग्स अँड क्वीन्स पबमध्ये काही संशयास्पद आणि बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची माहिती डीसीपी रिती राज यांना मिळाली होती. त्यांनी कोणतीही घाईगडबड न करता किंवा स्थानिक पोलिसांना सुगावा लागू न देता, स्वतः या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरवले.


शनिवारी मध्यरात्री डीसीपी रिती राज यांनी आपले कर्मचारी मागे ठेवले. त्यांनी सामान्य कपडे घातले होते, ज्यामुळे त्या वीकेंडला एन्जॉय करायला आलेली एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनिअर वाटत होत्या. त्या एकट्याच पबमध्ये कस्टमर बनून आत गेल्या.


मोबाईलमध्ये कैद केले पुरावे


पबमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी तिथल्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. पबच्या व्यवस्थापनाकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महिलांचा गैरवापर केला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एवढेच नाही तर, तिथे अल्पवयीन मुलांनाही दारू पुरवली जात होती. डीसीपी रिती राज यांनी पबमध्ये सुरू असलेल्या या अश्लील प्रकारांचे स्वतःच्या मोबाईल फोनमध्ये गुपचूप व्हिडिओ शूटिंग करून पुरावे गोळा केले.


इशारा मिळताच पोलिसांची धाड, ९ जण ताब्यात


बेकायदेशीर कृत्य होत असल्याची खात्री पटताच, डीसीपींनी बाहेर बसलेल्या पोलीस पथकाला सिग्नल दिला. पोलिसांच्या पथकाने तात्काळ पबमध्ये प्रवेश करून सर्च ऑपरेशन सुरू केले.


या कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ महिला आणि ५ पुरुषांसह एकूण ९ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासानुसार, पुरुष ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याकडून मोठी बिले उकळण्यासाठी महिलांचा वापर केला जात होता.


पबवर आधीही गुन्हे दाखल


तपासात, हा पब ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ सुरू होता. पब चालवण्यासाठी आवश्यक असलेले पोलिसांची एनओसी देखील व्यवस्थापनाकडे नव्हते. महत्त्वाचे म्हणजे, २०२५ मध्येही या पबविरुद्ध तीन गुन्हे दाखल झाले होते. मात्र, तरीही व्यवस्थापनाने गैरकृत्य सुरुच ठेवले.


कोण आहेत आयपीएस रिती राज?


रिती राज या पाटणा येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या माजी विद्यार्थिनी असून, त्यांनी दिल्लीच्या नामांकित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून कायदेशास्त्रचे शिक्षण (२०१६) पूर्ण केले आहे. त्या २०१८ च्या बॅचच्या तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी सायबर क्राईम आणि माधापूर झोनमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या त्या कुकटपल्लीच्या डीसीपी म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांच्या मुलाशी संबंधित प्रकरणाच्या एसआयटीच्या प्रमुख म्हणूनही त्या तपास करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,88,Amaravati,24,Aurangabad,50,Breakin,4,Breaking,4692,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1717,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,492,India,921,Jalgaon,37,Jalna,20,Kolhapur,34,Lifestyle,364,Maharashtra,2058,Mumbai,525,Nagpur,73,Nashik,83,Politics,714,Politics.,4,Pune,2038,Raigad,32,Ratnagiri,25,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,52,Sport,75,Technology,51,World,118,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: इंजिनिअर बनून IPS महिला अधिकारी पबमध्ये घुसली! मोबाईल काढला अन्... हाय-प्रोफाईल रॅकेट पकडलं
इंजिनिअर बनून IPS महिला अधिकारी पबमध्ये घुसली! मोबाईल काढला अन्... हाय-प्रोफाईल रॅकेट पकडलं
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtQIYtKmxaT0DF5ivjcQIhVsp8rZZUumhobZEKY4Avae_Whu61bIL7H3Ry0m8fqliPiqRnzTPxZCL9eF2wiNKzcMxfHtaoXEpdQm1Xf0ktJN8EaIGVEYCnNVfgMrF1-dr2qCN7a221cGT7minvrzVnZqB6XWOARDyXFbVIAAbUtOkKIpmHN_I8COKwYmA/s320/n71538143617809846169180bc22cbaa30696f803bc3edc341a1f4eee7d13a70003c9bbd44923adf5014af9.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtQIYtKmxaT0DF5ivjcQIhVsp8rZZUumhobZEKY4Avae_Whu61bIL7H3Ry0m8fqliPiqRnzTPxZCL9eF2wiNKzcMxfHtaoXEpdQm1Xf0ktJN8EaIGVEYCnNVfgMrF1-dr2qCN7a221cGT7minvrzVnZqB6XWOARDyXFbVIAAbUtOkKIpmHN_I8COKwYmA/s72-c/n71538143617809846169180bc22cbaa30696f803bc3edc341a1f4eee7d13a70003c9bbd44923adf5014af9.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/ips.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/ips.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content