IPS Vishwas Nangare Patil यांनी RSS चं कौतुक का केलं? कायद्यात बसतं का? वादावर म्हणाले, मी बोललो कारण.... | CrimeNama
Loading ...

IPS Vishwas Nangare Patil यांनी RSS चं कौतुक का केलं? कायद्यात बसतं का? वादावर म्हणाले, मी बोललो कारण....

  नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्याने पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका सुरू होती. मनसे अध...

 


नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्याने पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका सुरू होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विश्वास नांगरे पाटील यांच्यावर पोस्ट लिहून थेट नोकरीचा राजीनामा देऊन संघात भरती होण्याचा खोचक सल्ला दिला होता.त्यानंतर या सगळ्या वादावर विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांनी दिलेली मानवंदना स्वीकारून नागपूरचे मावळते पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. रविंद्र सिंघल यांनी पुष्प गुच्छ देऊन नांगरे पाटील यांचे स्वागत करून त्यांच्या नव्या कारकीर्दीला शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक, होणार्‍या टीकेवर विश्वास नांगरे पाटील यांचे स्पष्टीकरण



पोलीस अधिकारी म्हणून काम करताना एका धार्मिक संघटनेचे उघडपणे कौतुक करणे कितपत योग्य वाटते, असे नांगरे पाटील यांना विचारले होते. नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत होत असलेल्या टीकेवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "हिंदू संघटनेमार्फत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमात मी जे काही बोललो ते कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगाने बोललो. बोलताना सगळ्या गोष्टी कायद्याच्या कक्षेत बसतील, असेच मी बोललो. मी कुठेही नियमांचा भंग केलेला नाही".

नागपूर पोलीस आयुक्त म्हणून शहरासमोरील आव्हाने काय वाटतात?



नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताना नेमकी कोणती आव्हाने वाटतात असे विचारले असता नांगरे पाटील म्हणतात, मी इथे अहोरात्र काम करण्यासाठी आलेलो आहे. रात्री शहरात फिरणे हे माझे पॅशन आहे. पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, सह-पोलीस आयुक्त म्हणून मी मुंबईत काम केले आहे. मुंबईतील आव्हाने आणि नागपूरची आव्हाने अतिशय वेगळी आहे. माझे सहकारी, अधिकारी अतिशय प्रोफेशनल आहेत. आमचे पोलीस महानिरीक्षक सदानंद दाते सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अतिरिक्त पोलीस आयुक्त बेस्ट रिजनचा म्हणून काम केले आहे. अतिशय प्रामाणिकपणे नागपूर शहराची सेवा करणे हे आमचे काम आहे. हेच काम करण्यासाठी मी नागपूरला आलेलो आहे.


ऑपरेशन थंडरच्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवकांना ड्रग्जच्या विळख्यातून वाचवणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक ठिकाणी काम करताना मोठे आव्हान असते. पोलीस उपस्थित असताना सुरक्षित वाटणे ही बाब भूषणावह नाही. पण पोलीस उपस्थित नसताना माता भगिनींना मुलींना सुरक्षित कसे वाटेल, यासाठी प्रयत्न मी नाशिकला पोलीस आयुक्त असताना, पश्चिम महाराष्ट्राला विशेष पोलीस महानिरीक्षक असताना आणि मुंबईत सह पोलीस आयुक्त असताना १०० निर्भया पथके आम्ही लाँच केलेली होती, असे विशेष करून नांगरे पाटील यांनी नमूद केले.

आरएसएसवर नांगरे पाटील नेमके काय म्हणाले होते?



आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त, देशभक्ती आणि विचारसरणीचे गौरवाने कौतुक केले होते. केशव बळीराम हेडगेवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचे देखील त्यांनी कौतुक केले होते.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,90,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4975,Buldhana,20,Chandrapur,6,Cooking,6,Crime,1857,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,101,Gadchiroli,6,Health,501,India,1040,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,37,Lifestyle,397,Maharashtra,2198,Mumbai,545,Nagpur,79,Nashik,85,Politics,764,Politics.,8,Pune,2104,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,55,Sindhudurg,7,Solapur,54,Sport,79,Technology,57,World,126,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: IPS Vishwas Nangare Patil यांनी RSS चं कौतुक का केलं? कायद्यात बसतं का? वादावर म्हणाले, मी बोललो कारण....
IPS Vishwas Nangare Patil यांनी RSS चं कौतुक का केलं? कायद्यात बसतं का? वादावर म्हणाले, मी बोललो कारण....
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjOrJ7f5jpbJXx5j_xULmj-N2XNhJhc1TkRhyqaxZOpk-4o41R30uYzJEtgHefl2bDyL81fHdjdmSy-5L2EsSSI1XnuAAUy-sw7F8VMG7ATrkkpXJ3O4KI1Ykz7aAkQptfHSkekIbWSxG0vloD8wvuYv8aBwLlVHMNwe7coed3-8J1wMknvAfovi8oO3i4/s320/IMG_20260630_172658.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjOrJ7f5jpbJXx5j_xULmj-N2XNhJhc1TkRhyqaxZOpk-4o41R30uYzJEtgHefl2bDyL81fHdjdmSy-5L2EsSSI1XnuAAUy-sw7F8VMG7ATrkkpXJ3O4KI1Ykz7aAkQptfHSkekIbWSxG0vloD8wvuYv8aBwLlVHMNwe7coed3-8J1wMknvAfovi8oO3i4/s72-c/IMG_20260630_172658.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/ips-vishwas-nangare-patil-rss.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/ips-vishwas-nangare-patil-rss.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content