IPL फायनल बघून झोपला अन् गमावला जीव, 'त्या' रात्री बुरख्यात कोण आलं? | CrimeNama
Loading ...

IPL फायनल बघून झोपला अन् गमावला जीव, 'त्या' रात्री बुरख्यात कोण आलं?

  Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये 31 मे रोजी रात्री कॉम्प्युटर कोचिंग चालक प्रकाश चंद्र गुप्ता यांची निर्घृण हत्या करण्यात आली. प्...

 


Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये 31 मे रोजी रात्री कॉम्प्युटर कोचिंग चालक प्रकाश चंद्र गुप्ता यांची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रकाश चंद्र क्रिकेटचे शौकीन होते आणि आयपीएल फायनलच्या दिवशी त्यांनी मॅच बघून कोचिंग सेंटरमध्येच झोपणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते.मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे 5 लाख रुपयांची सोन्याची साखळी व हातातील ब्रेसलेट गायब होते. सुरुवातीला पोलिसांना हा मृत्यू अपघात वाटला, पण मौल्यवान दागिने गायब असल्याने पोलिसांनी तातडीने हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे 5 लाख रुपयांची सोन्याची साखळी व हातातील ब्रेसलेट गायब होते. सुरुवातीला पोलिसांना हा मृत्यू अपघात वाटला, पण मौल्यवान दागिने गायब असल्याने पोलिसांनी तातडीने हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.


बुरखा घातलेली व्यक्ती कोण?

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. दरम्यान, पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोचिंग सेंटरजवळून बुरखा घालून जाणारी एक संशयास्पद महिला दिसली. त्या महिलेची चाल आणि देहबोली स्त्रियांसारखी वाटत नसल्याने पोलीस आयुक्तांना संशय आला. 

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. दरम्यान, पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोचिंग सेंटरजवळून बुरखा घालून जाणारी एक संशयास्पद महिला दिसली. त्या महिलेची चाल आणि देहबोली स्त्रियांसारखी वाटत नसल्याने पोलीस आयुक्तांना संशय आला. त्यांनी त्या बुरखाधारी व्यक्तीचा माग काढण्यास सुरुवात केली असता, ती व्यक्ती एका कारमधून उतरल्याचे समोर आले. अधिक तपासात ती कार आणि बुरखा घातलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, मृत प्रकाश चंद्र यांचा 18 वर्षांपासूनचा जिवलग मित्र मोहित द्विवेदी असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी संशयित मोहितला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मोहित स्वतः देखील आधी कोचिंग चालवत होता, मात्र ते बंद झाल्यामुळे तो आर्थिक अडचणीत होता. काही दिवसांपूर्वी प्रकाश यांच्यासोबत खजुराहो येथे फिरायला गेला असताना, प्रकाशने त्याला आपली 5 लाख रुपयांची सोन्याची साखळी दाखवली होती. तेव्हापासून मोहितची नजर त्या साखळीवर होती. त्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी युट्यूबवर व्हिडिओ पाहून हत्येचा कट रचला होता. यासाठी त्याने बाजारातून खास बुरखा आणि चप्पल खरेदी केली होती.

'त्या' रात्री काय घडलं?


31 मे रोजी रात्री मोहित कारने घटनास्थळी पोहोचला आणि कारमध्येच बुर्खा परिधान करून त्याने प्रकाशच्या खोलीत प्रवेश केला. दारूच्या नशेत असलेल्या प्रकाशकडून दागिने हिसकावताना झालेल्या झटापटीत प्रकाश जमिनीवर पडला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पकडले जाऊ नये म्हणून मोहित दुसऱ्या दिवशी स्वतः पीडित कुटुंबासोबत राहून पोलिसांशी चर्चा करत होता आणि नंतर एका मैत्रिणीला परीक्षेसाठी लखनऊला घेऊन गेला होता. या घटनेमुळे मृत प्रकाश यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, 18 वर्षांच्या मैत्रीचा असा भयानक अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.



COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,88,Amaravati,24,Aurangabad,50,Breakin,4,Breaking,4692,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1717,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,492,India,921,Jalgaon,37,Jalna,20,Kolhapur,34,Lifestyle,364,Maharashtra,2058,Mumbai,525,Nagpur,73,Nashik,83,Politics,714,Politics.,4,Pune,2038,Raigad,32,Ratnagiri,25,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,52,Sport,75,Technology,51,World,118,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: IPL फायनल बघून झोपला अन् गमावला जीव, 'त्या' रात्री बुरख्यात कोण आलं?
IPL फायनल बघून झोपला अन् गमावला जीव, 'त्या' रात्री बुरख्यात कोण आलं?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhH7tVTyDYHg_1SU-U7dYkekbDjtCaTt4d1RXfDm2UlTfxeB4QwOQpzOPSawhTJ0uhSpteWPmdobaSTkN4dPU8dr6sCHiwWcKbWMQ9fNWTPNvsjJpUOLMFq-4eUmE3RDhuSQfdeXoP-1Q3CVf0nJhy2YfCiMuIHlpeDRaduwNM4w-fatgD-3oPc3zW97iQ/s320/n7150290241780718693253a88af4711a78013e153507b539f2f3cfdadda54cf9448fa60ac1a586f9703017.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhH7tVTyDYHg_1SU-U7dYkekbDjtCaTt4d1RXfDm2UlTfxeB4QwOQpzOPSawhTJ0uhSpteWPmdobaSTkN4dPU8dr6sCHiwWcKbWMQ9fNWTPNvsjJpUOLMFq-4eUmE3RDhuSQfdeXoP-1Q3CVf0nJhy2YfCiMuIHlpeDRaduwNM4w-fatgD-3oPc3zW97iQ/s72-c/n7150290241780718693253a88af4711a78013e153507b539f2f3cfdadda54cf9448fa60ac1a586f9703017.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/ipl.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/ipl.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content