फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ( FIFA World Cup 2026) मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. दोन वेळेची वर्ल्ड चॅम्पियन उरु्ग्वेचा प्रवास संपुष्टात आला...
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ( FIFA World Cup 2026) मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. दोन वेळेची वर्ल्ड चॅम्पियन उरु्ग्वेचा प्रवास संपुष्टात आला आतर आपला पहिलाच विश्वचषक खेळणाऱ्या केप व्हर्डेने राऊंड ऑफ ३२ मध्ये पोहचून इतिहास रचला आहे. शनिवारी (२७ जून) एस्तादियो ग्वादालहारा येथे झालेल्या गट 'एच'च्या निर्णायक सामन्यात, ॲलेक्स बाएनाने पहिल्या सत्रात केलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने उरुग्वेचा १-० ने पराभव केला. या पराभवामुळे उरुग्वे बाद फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडला. तर, दुसरीकडे शनिवारी खेळल्या गेलेल्या त्याच गटातील दुसऱ्या रोमांचक सामन्यात, केप व्हर्डेने सौदी अरेबियाविरुद्धचा सामना ०-० ने ड्र्रॉ केला. स्पेनने उरुग्वेला १-० ने पराभूत केल्यामुळे, केप व्हर्डे आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर कायम आहे. केप व्हर्डे आता नॉकआऊट फेरी गाठणारा सर्वात लहान देश ठरला आहे.
Siuuu… CR7 इज Back; उझबेकिस्तानविरुद्ध गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा FIFA World Cup 2026 मध्ये नवा जागतिक विक्रम
आता केप व्हर्डेचा सामना अर्जेंटिनाशी होईल
केवळ ५ लाख लोकसंख्या असलेल्या या लहान देशाने, आपल्या गटातील तिन्ही सामने अपराजित राहून इतिहास रचला आहे. आता, ३२ संघांच्या फेरीत केप व्हर्डेसमोर आणखी एक मोठे आव्हान आहे. त्यांचा पुढील सामना ४ जुलै रोजी गतविजेत्या अर्जेंटिनाशी मियामी येथे होणार आहे. दोन्ही संघांमध्ये तशी खरी स्पर्धा नसली तरी, अर्जेंटिना हा खूपच मोटा संघ आहे. परंतु, केप व्हर्डेसाठी इतिहासात आपले नाव कोरण्याची ही एक उत्तम संधी आहे. हा संघ आणखी एक अनपेक्षित विजय मिळवून अव्वल १६ संघांमध्ये आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.
४० वर्षीय गोलकीपर वोझिन्हाची चमकदार कामगिरी
केप व्हर्डेच्या ऐतिहासिक कामगिरीचा सर्वात मोठा नायक त्यांचा ४० वर्षीय गोलकीपर, वोझिन्हा होता. सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात, वोझिन्हाने तीन आश्चर्यकारक बचाव केले, ज्यामुळे सौदी अरेबिया थक्क झाला . पहिल्या हाफच्या स्टॉपेज टाइममध्ये, त्याने मोहम्मद कानोचा एक शानदार हेडर अडवून सौदी अरेबियाला आघाडी घेण्यापासून रोखले. त्यानंतर, दुसऱ्या हाफमध्ये, त्याने उडी मारून मोहम्मद अबू अल-शमातचा एक धोकादायक शॉट अडवला. ९२ व्या मिनिटाला, वोझिन्हाने अब्दुल्ला अल-हमदानचा एक अचूक शॉट देखील अडवला आणि आपल्या संघाचे नॉकआऊटमधील स्थान निश्चित केले.


COMMENTS