रुग्णालयांची औषध सक्ती आता खपवून घेतली जाणार नाही; FDA चा कडक आदेश, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई! | CrimeNama
Loading ...

रुग्णालयांची औषध सक्ती आता खपवून घेतली जाणार नाही; FDA चा कडक आदेश, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई!

   भंडारा शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना संलग्न (अटॅच्ड) मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती...

 


 भंडारा शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना संलग्न (अटॅच्ड) मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.या गंभीर बाबीची दखल घेत भंडारा अन्न व औषध प्रशासनाने आता जिल्ह्यातील अशा रुग्णालयांवर आणि औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. रुग्णालयातूनच औषधे खरेदी करण्याची कोणतीही सक्ती नाही, असे स्पष्ट करणारे मराठी आणि इंग्रजी भाषेतील सूचना फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे आता जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश देखील जिल्हा औषध प्रशासनाला देण्यात आले आहे.


मराठी-इंग्रजीत फलक लावणे अनिवार्य


ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने, जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयाला आपल्या प्रवेशद्वारावर, बिलिंग काउंटरवर आणि दर्शनी भागात रुग्णांना कोणत्याही मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचे स्वातंत्र्य आहे, असे स्पष्ट लिहिलेले मराठी आणि इंग्रजी भाषेतील सूचना फलक लावणे बंधनकारक केले आहे.


संलग्न मेडिकलमधून औषध खरेदीची सक्ती नको


जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालये आपल्याच आवारात असलेल्या किंवा विशिष्ट संलग्न मेडिकलमधून औषधे घेण्याचा आग्रह धरतात. काही ठिकाणी तर बाहेरील औषधे स्वीकारलीच जात नसल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने या हुकूमशाहीला चाप लावला असून, अशी सक्ती पूर्णपणे बेकायदेशीर ठरवली आहे.


कुठे आणि कशी करावी तक्रार?


जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयाने ठराविक मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती केली, तर रुग्ण किंवा नातेवाईक थेट अन्न व औषध प्रशासन भंडारा कार्यालयात किवा एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावर लेखी तक्रार नोंदवू शकतात. तसेच एफडीएच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.


अन्यथा अन्न व औषध प्रशासन करणार कारवाई


नियमांचे उल्लंघन करून रुग्णांना विशिष्ट दुकानातूनच औषधे घेण्यास भाग पाडणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णालयांवर आणि संबंधित मेडिकल स्टोअर्सवर एफडीएकडून परवाना रद्द करण्यापासून ते फौजदारी गुन्हे दाखल करण्यापर्यंतची कारवाई केली जाईल.


जिल्ह्यात ५०० रुग्णालये, ५ हजार मेडिकल


संपूर्ण भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर, जिल्ह्यात सुमारे ५०० लहान-मोठी खासगी रुग्णालये, नर्सिंग होम आणि क्लिनिक्स असून, बाजारात ५ हजारांहून अधिक औषध विक्रेते (मेडिकल स्टोअर्स) कार्यरत आहेत. या मोठ्या नेटवर्कवर लक्ष ठेवण्यासाठी आणि रुग्णांची फसवणूक रोखण्यासाठी भंडारा एफडीएने विशेष मोहीम हाती घेतली आहे.


विशिष्ट बँड, जास्त नफा कमावण्याची वृत्ती


काही रुग्णालये आणि औषध कंपन्यांमध्ये अंतर्गत युती असते. ठराविक ब्रेडचीच औषधे लिहिली जातात, जी फक्त त्याच रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये मिळतात. यामागे जास्त नफा (मार्जिन) कमावण्याची वृत्ती असून, यामुळे रुग्णांचे आर्थिक शोषण होते. जिल्ह्यातील या साखळीला आता चाप बसणार आहे.


रुग्णांना कुठूनही औषध खरेदीचा अधिकार


जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांना त्यांच्या पसंतीच्या आणि परवडणाऱ्या कोणत्याही नोंदणीकृत मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. रुग्णालय व्यवस्थापन त्यांच्या या हक्कावर गदा आणू शकत नाही.


रुग्णालयात एमआरपी, बाहेर मात्र डिस्काउंट


भंडारा येथील बऱ्याच रुग्णालयातील संलग्न मेडिकलमध्ये औषधांवर छापील किंमत वसूल केली जाते. याउलट, बाहेरील बाजारात स्पर्धा असल्याने सामान्य मेडिकल चालक रुग्णांना १० ते ३० टक्क्यांपर्यंत सवलत (डिस्काउंट) देतात. रुग्णालयाच्या सक्तीमुळे जिल्ह्यातील गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना या आर्थिक फायद्यापासून वंचित राहावे लागत होते.


प्रिस्क्रिप्शन नातेवाइकांच्या हातात देणे बंधनकारक


डॉक्टरांनी औषधांची चिठ्ठी थेट अंतर्गत मेडिकलमध्ये न पाठवता ती रुग्णाच्या नातेवाइकांच्या हातात देणे बंधनकारक आहे. चिठ्ठीवर औषधांचे जेनेरिक किंवा स्पष्ट नाव असणे आवश्यक आहे, जेणेकरून नातेवाइकांना भंडारा शहरातील इतर कोणत्याही दुकानातून ती औषधे सहज घेता येतील.

COMMENTS

Name

Agriculture,97,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4806,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1765,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,497,India,952,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,374,Maharashtra,2126,Mumbai,536,Nagpur,77,Nashik,85,Politics,741,Politics.,7,Pune,2061,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,123,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: रुग्णालयांची औषध सक्ती आता खपवून घेतली जाणार नाही; FDA चा कडक आदेश, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई!
रुग्णालयांची औषध सक्ती आता खपवून घेतली जाणार नाही; FDA चा कडक आदेश, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCXgJBzWY80v1HXUiy5Kd7y3d_EZ5tKwt7xWln92QU7VSu9ezmGJeuLq2km3ahdnoWHrTEE2KhelzWoPYnaeSyQc1L3cyxQeq0MVOMds4kC_AUsGovIC2EnSl_0tpF5quOD_QGmfXaRYTTg1iMq5-g8BK0GBYBr7y_i0DOv-VS8oa0tDtfmW1_TJfa7QQ/s320/IMG_20260623_101743.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCXgJBzWY80v1HXUiy5Kd7y3d_EZ5tKwt7xWln92QU7VSu9ezmGJeuLq2km3ahdnoWHrTEE2KhelzWoPYnaeSyQc1L3cyxQeq0MVOMds4kC_AUsGovIC2EnSl_0tpF5quOD_QGmfXaRYTTg1iMq5-g8BK0GBYBr7y_i0DOv-VS8oa0tDtfmW1_TJfa7QQ/s72-c/IMG_20260623_101743.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/fda.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/fda.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content