Pranit More Dentist Question: वादात सापडलेला स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरेसंदर्भात सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला जात आहे. प्रणितच्या ...
Pranit More Dentist Question: वादात सापडलेला स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरेसंदर्भात सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला जात आहे. प्रणितच्या कार्यक्रमामध्ये आधी महिलांबद्दल अश्लील शेरेबाजी करण्यात आली आणि त्यानंतर मुंबईतील एका डॉक्टर तरुणीने याच शोमध्ये मृतदेहांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं.या मुळे वादात सापडलेल्या प्राणितने माफीही मागितली असून अजून एक संधी देण्याची मागणी केली आहे. मात्र असं असतानाच दुसरीकडे प्रणितच्या कार्यकर्मातील इतर व्हिडीओही समोर येत असून हे व्हिडीओ 370 की बिर्याणी या हिमांशु जांगडाच्या आणि डॉक्टर सेजल पवारने मृतांच्या लिंगांसंदर्भात केलेल्या विधानाहून विचित्र विधान केल्याचं समोर आलं आहे. प्रणितच्या कार्यक्रमातील ही क्लिपही व्हायरल झाली आहे.
व्हिडीओमध्ये आहे काय?
या क्लिपमध्ये प्रणितने त्याच्या कार्यक्रमात आलेल्या माहिला डेंटिस्टला अश्लील प्रश्न विचारल्याचं दिसून येत आहे. ओरल सेक्सचा संदर्भ देत प्रणित या महिला डॉक्टरला घाणेरडे प्रश्न विचारताना दिसतोय. प्रणितने या महिला डॉक्टरला, "तुमच्यासोबत असं कधी घडलं आहे का, महिला रुग्ण तुमच्याकडे आली आणि तिच्या दातांमध्ये पुरुषाच्या वीर्याचा अंश सापडलाय का?" असा प्रश्न विचारला. पुढे प्राणित याहूनही घाणेरडी विधानं करताना दिसतोय. मात्र हे प्रश्न ऐकून महिला डॉक्टरलाही अवघढल्यासारख्या झालं. तिने कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. पण हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिससडकून टीका
अनेकांनी प्रणितने माफी मागतिल्यावर त्याला संधी दिली पाहिजे असं वाटत असतानाच हा व्हिडीओ समोर आल्याने प्रणित खरोखरच शिक्षेस पात्र आहे असं वाटत असल्याच म्हटलं आहे. "काल, जेव्हा प्रणित मोरेने माफी मागितली, तेव्हा असं वाटलं की कदाचित त्या माणसाकडून एकदाच चूक झाली असेल, चला त्याला माफ करून पुढे जाऊया. पण माझा अंदाज पूर्णपणे चुकला. हा माणूस क्षमेस पात्र नाही. आता त्याचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिला डेंटिस्टसमोर इतक्या घाणेरड्या आणि अश्लील टिप्पण्या केल्या आहेत. त्याने ओरल सेक्स आणि दातांमध्ये पुरुषांच्या वीर्याचे अंश आढळण्याबद्दल प्रश्न विचारले. हे प्रश्न कोणी आपल्या कुटुंबासोबत किंवा सार्वजनिक ठिकाणी ऐकूही शकणार नाही असे होते. संभाषणादरम्यान, ती महिला डॉक्टर स्वतः अत्यंत अस्वस्थ दिसत होती," असं राहुल कुमार नावाच्या व्यक्तीने प्रणितवर निशाणा साधताना म्हटलं आहे"आधी बिर्याणीबद्दल घाणेरडं बोलणं, मग वैद्यकीय संशोधनात मृतदेहांच्या गुप्तांगांची खिल्ली उडवणं आणि आता एका महिला डेंटिस्टसोबत असा अश्लीलपणा करणं यावरून हे स्पष्ट दिसतं की ही काही अनवधानाने झालेली चूक नाही. ही त्याची घृणास्पद मानसिकता आहे. विनोदाच्या नावाखाली असं घाणेरडं आणि निर्लज्ज विधानं करतात, त्यांचा सत्यानाश होवो! अशा लोकांना समाजात मोकळेपणाने फिरण्याचा अधिकार नाही. त्याच्या सर्व व्हिडिओंची चौकशी करण्याच्या महाराष्ट्र पोलिसांच्या आदेशांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्याच्यावर शक्य तितकी कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून भविष्यात विनोदाच्या नावाखाली इतर कोणीही अशी घाण पसरवू शकणार नाही," अशा शब्दांमध्ये राहुल कुमारने आपल्या पोस्टमधून टीका केली आहे.
प्रणित मोरे या वादात सापडल्यापासून त्याचे अनेक व्हिडीओ समोर येत असतानाच डेंटिस्टच्या या व्हिडीओवरुनही मोठा वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



COMMENTS