बायकोचा परफेक्ट प्लॅन, पण प्रियकराच्या चुकीने सगळं समोर; नवऱ्याला का संपवलं? | CrimeNama
Loading ...

बायकोचा परफेक्ट प्लॅन, पण प्रियकराच्या चुकीने सगळं समोर; नवऱ्याला का संपवलं?

  एका महिलेने विम्याचे पैसे मिळावे यासाठी आपल्याच नवऱ्याची हत्या केली. एखाद्या सिनेमाची कथा वाटावी अशी ही घटना आहे. तिचा नवरा माजी सैनिक होत...

 


एका महिलेने विम्याचे पैसे मिळावे यासाठी आपल्याच नवऱ्याची हत्या केली. एखाद्या सिनेमाची कथा वाटावी अशी ही घटना आहे. तिचा नवरा माजी सैनिक होता. एका किरकोळ बाईक अपघातानंतर त्याचा मृत्यू झाला.मात्र पोलीस तपासात वेगळीच माहिती उघड झाली. संदीप मांजरगी असे मृत माजी सैनिकाचे नाव असून, त्यांच्या पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून रुग्णालयातच त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर, वैद्यकीय आणि प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या हत्येला हृदयविकाराच्या झटक्याचे रूप देण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकरून 2 कोटी रुपयांचा विमा क्लेम करता येईल. याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह एकूण नऊ जणांना अटक केली आहे. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील ही घटना आहे.


निरोगी असताना हृदयविकाराचा झटका कसा?


13 मार्च रोजी संदीप यांच्या बाईकचा किरकोळ अपघात झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी सुमा हिने त्यांना आधी एका शासकीय रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. 15 मार्च रोजी डॉक्टरांनी संदीप यांना मृत घोषित केले आणि मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बीआयएमएस रुग्णालयात पाठवण्यात आला, जिथे सुरुवातीच्या फॉरेन्सिक अहवालात कोणताही विषप्रयोग झाला नसल्याचे सांगत मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्ट (हृदयविकाराचा झटका) असल्याचे नमूद करण्यात आले.स्टेटसमुळे हत्येचा उलगडा


यामधून आपण आता सुटलो असे मृताच्या बायकोला वाटत असतानाच एक वेगळाच प्रकार घडला. तिच्या प्रियकराने म्हणजेच पुंडलिकने सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केला. यामध्ये त्याने या अपघातातील व्यक्तीचा अचानक मृत्यू कसा झाला, याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते, ज्यातून त्याला या घटनेची आतली माहिती असल्याचे दिसून येत होते. या संशयास्पद स्टेटसमुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्याने या संपूर्ण खुनाचा कट पोलिसांसमोर कबूल केला. पुंडलिक आणि संदीप हे दोघे व्यावसायिक भागीदार होते आणि त्यांनी एकत्र हॉटेल व्यवसाय सुरू केला होता, याच काळात सुमा आणि पुंडलिक यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. संदीप यांच्या नावावर वेगवेगळ्या तीन कंपन्यांमधून सुमारे 2 कोटी रुपयांच्या विमा पॉलिसी काढण्यात आल्या होत्या आणि ही रक्कम हडपण्यासाठीच हा कट रचण्यात आला होता.रक्ताने माखलेली बेडशीट अन् दारुच्या बाटल्या, होमस्टेमध्ये महिला IT कर्मचाऱ्यासोबत काय घडलं?


रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग


तपासादरम्यान समोर आले की, संदीप यांच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयातील काही कर्मचारीही या कटात सामील झाले. सुमा आणि पुंडलिक यांनी उपचारादरम्यान सलाईनच्या बाटलीतून संदीप यांना विष दिले आणि झोपेच्या गोळ्याही दिल्या. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी वैद्यकीय आणि फॉरेन्सिक रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालात विषाचा अंश सापडू नये म्हणून प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना तब्बल 3 लाख रुपयांची लाच देण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी सुमा, पुंडलिक यांच्यासह एक डॉक्टर, सरकारी अधिकारी आणि फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून विषाचे डबे, सुया, मोबाईल फोन आणि इतर गुन्‍ह्याचे साहित्य जप्त केले आहे.

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4842,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1773,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,967,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2145,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,754,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: बायकोचा परफेक्ट प्लॅन, पण प्रियकराच्या चुकीने सगळं समोर; नवऱ्याला का संपवलं?
बायकोचा परफेक्ट प्लॅन, पण प्रियकराच्या चुकीने सगळं समोर; नवऱ्याला का संपवलं?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh1ma7P0BmL7xx_dMqLfKLKZntlV1xB8v-yIvKQCZNyuH9XW0XXd8N7NrpjLkZdIjN5qnhWHIc0qCwvhARHi6E6bVD9wCOTnXckzTCPM3xqaN4kUeQpd4-r986q3UH0bbfrzLZ9fElOHWl4OjwKUACXIwq8NFDBVo3XFlb40Qt5kAbf_chOth21RlERv44/s320/n7162507571781627576309ddcd95d10da0084b1df45ff918abec31edd22d5adae13afd757bdd653b350ba5.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh1ma7P0BmL7xx_dMqLfKLKZntlV1xB8v-yIvKQCZNyuH9XW0XXd8N7NrpjLkZdIjN5qnhWHIc0qCwvhARHi6E6bVD9wCOTnXckzTCPM3xqaN4kUeQpd4-r986q3UH0bbfrzLZ9fElOHWl4OjwKUACXIwq8NFDBVo3XFlb40Qt5kAbf_chOth21RlERv44/s72-c/n7162507571781627576309ddcd95d10da0084b1df45ff918abec31edd22d5adae13afd757bdd653b350ba5.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_967.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_967.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content